BCCI नं उचललं मोठं पाऊल, IPL मध्ये फक्त ‘या’ गोष्टीवर ‘वॉच’ राहणार ‘चौथ्या’ अंपायरचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष झाल्यानंतर गांगुलीने विविध प्रकारचे मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली असून आता त्याने आयपीयलबाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन प्रिमीअर लीगला अधिक सक्षम आणि रोमांचक करण्यासाठी विविध नवे नियम लागू केले जाणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या पर्वात पावर प्लेयरचा वापर करण्यावर चर्चा सुरु असून आता नवीन माहिती समोर येत आहे. त्यानुसार आता आयपीएलमध्ये चार अंपायर असणार असून चौथ्या अंपायरची नेमणूक खास कामासाठी केली जाणार आहे.

मागील पर्वात अंपायरकडून मोठ्या प्रमाणात चुकी झाल्याने यावेळी यावर तोडगा काढण्यासाठी हा नवीन निर्णय घेतला जाणार आहे. मागील हंगामात अंपायरच्या निर्णयाचा फटका बऱ्याच संघांना बसला. मुख्यत: नो-बॉलबाबत अंपायरकडून चुकीचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे सामन्यांत चार अंपायरची नेमणूक केली जाणार आहे. बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत यावर निर्णय होणार असून यामुळे क्रिकेटमध्ये मोठी क्रांती होणार आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार,सामनादरम्यान चूका कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

त्यासाठी नो-बॉलचा निर्णय घेण्यासाठी एका विशेष अंपायरची नेमणुक करण्यात येणार आहे. चौथा अंपायर आणि मैदानावरील उपलब्ध अंपायर आणि तिसरे अंपायर यांच्यासोबत काम करतील. त्यामुळे मैदानावरील अंपायरचा ताण कमी होणार असून खेळाडूंना आणि खेळाचा दर्जा सुधारण्यास याचा मोठा फायदा होणार आहे.

आयपीएलआधी स्थानिक स्पर्धांमध्ये करणार चाचणी
या निर्णयाची आयपीएलमध्ये अंमलबजावणी करण्याआधी बीसीसीआय स्थानिक स्पर्धांमध्ये चाचणी केली जाणार असून रणजी सामन्यांमध्ये याची चाचणी केली जाणार आहे. त्याचबरोबर पावर प्लेअरचे समावेशाविषयी देखील वार्षिक बैठकीत निर्णय होणार असून पुढील पर्वामध्ये मात्र या नवीन नियमाचा समावेश केला जाणार नाही. या नियमाची देखील चाचणी केली जाणार असून वेळेच्या कमीमुळे या पर्वात हा निर्णय लागू होणार नाही.

Visit : Policenama.com