IPL 2020 : ‘गेल’नं केला भोजपुरी गाण्यावर ‘डान्स’, पंजाबनं पहिल्या सामन्यात नाही दिली संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीग 2020 (IPL 2020) च्या दुसर्‍या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचे प्रमुख प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार केएल राहुल यांनी ख्रिस गेलला संघातून बाहेर ठेवत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. दिल्ली कॅपिटलशी झालेल्या सामन्यात पंजाबने युवा खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला. पंजाबने मॅक्सवेल, ख्रिस जॉर्डन, शेल्डन कॉटरेल आणि निकोलस पूरन या चार विदेशी खेळाडूंना संधी दिली. ख्रिस गेल टीममध्ये नसल्याचे पाहून चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ दोघेही आश्चर्यचकित झाले होते.

गेल पहिल्या सामन्यातून का बाहेर पडले आहेत?
ख्रिस गेलने इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावली असून त्यांच्या नावावर 28 अर्धशतके आहेत. तसेच गेलची सरासरी 41.13 आहे, पण तरीही पंजाबने त्यांना संघात संधी का दिली नाही. वास्तविक ख्रिस गेलची फिटनेस पूर्वीसारखी नाही, ते 40 वर्षांचे झाले आहेत. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेने आधीच सांगितले होते की गेल या सीझनमध्ये अधिकतर बेंचवर बसलेले दिसून येतील. युवा फलंदाजांना मदत करण्याची त्यांची भूमिका असेल.

https://www.instagram.com/p/CFWlzBnhATK/?utm_source=ig_web_copy_link

गेलने केला भोजपुरी गाण्यावर डान्स
ख्रिस गेललाही त्यांच्या भूमिकेविषयी माहिती आहे आणि त्यांना माहित आहे की या सीझनमध्ये ते एक सल्लागार म्हणून टीममध्ये असू शकतात. यामुळेच ख्रिस गेल आपल्याच स्टाईलमध्ये आयपीएलचा आनंद घेत आहेत. ख्रिस गेलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते भोजपुरी गाण्यावर नाचताना दिसत आहेत. ख्रिस गेल दिल्लीविरुद्ध टॉस करण्यापूर्वी देखील नाचताना दिसले. त्यांनी शेल्डन कॉटरेल या वेगवान गोलंदाजास डेब्यू कॅप सोपविली, त्यादरम्यान त्यांनी या वेगवान गोलंदाजाला सॅल्यूट करत डान्स केला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like