जसप्रीत बुमराहकडून एकाच ओव्हरमध्ये हिसकावली गेली पर्पल कॅप, आता फायनलमध्ये होईल खरी लढत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलची लढाई आता अखेरच्या टप्प्यात पोहाेचली आहे. मंगळवारी फायनलमध्ये मुंबई इंडियन्सची लढत दिल्ली कॅपिटल्सशी होईल. रविवारी क्वाॅलिफायर दोनमध्ये दिल्लीने सनरायझर्सचा पराभव केला. तिकडे पर्पल कॅपची रेससुद्धा आता उत्कंठा वाढवणारी झाली आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्सच्या कॅगिसी रबाडाने मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहकडून पर्पल कॅप (purple cap) हिसकावली. यातील एक विशेष बाब ही आहे की, आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारे तीन गोलंदाज फायनल खेळतील.

एका ओव्हरमध्ये पर्पल कॅपवर कब्जा
सनरायझर्सच्या विरुद्ध क्वाॅलिफायर टूची मॅच सुरू होण्यापूर्वी कॅगिसो रबाडा 25 विकेटसह पर्पल कॅपच्या रेसमध्ये दुसर्‍या नंबरवर होता. त्यांनी या मॅचमध्ये चार विकेट घेऊन बुमराहला मागे टाकले. आता रबाडाच्या खात्यात 29 विकेट झाल्या आहेत. त्याने एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट घेऊन बुमराहकडून पर्पल कॅप हिसकावून घेतली आहे. रबाडा या ओव्हरमध्ये हॅट्रिकसुद्धा करू शकत होता. परंतु, त्यांनी 2 विकेट घेतल्यानंतर वाइड बॉल टाकला. फायनलमध्ये हे दोन्ही गोलंदाज खेळतील. अशात दोघांमध्ये पर्पल कॅपबाबत जबरदस्त टक्कर पाहायला मिळेल. रबाडा आणि बुमराहनंतर तिसर्‍या नंबरवर मुंबई इंडियन्सचा ट्रेंट बोल्ट आहे. त्याने आतापर्यंत 22 विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह कोणत्याही एका सीझनमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे. यापूर्वी 2017 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना भुवनेश्वरने 26 विकेट घेतल्या होत्या. आता बुमराहच्या नावावर 27 विकेट आहेत.

रेकॉर्ड तोडणार का?
आयपीएलच्या एका सीझनमध्ये सर्वात जास्त विकेट घेण्याच्या रेकॉर्डवर सध्या ड्वेन ब्राव्होचा कब्जा आहे. त्याने 2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी 32 विकेट घेतल्या होत्या. आता दुसर्‍या नंबरवर 29 विकेटसह रबाडा पोहाेचला आहे. म्हणजे आणखी 4 विकेट घेऊन तो रेकॉर्ड तोडू शकतो. तिसर्‍या नंबरवर 28 विकेटसह लसिथ मलिंगा आणि जेम्स फॉकनर आहेत. या दोघांच्या नावावर 28-28 विकेट आहेत.