काय सांगता ! होय, मुंबई इंडियन्सनं युवराज सिंगसह 7 खेळाडूंना संघातून काढलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएल 2020 च्या लिलावापूर्वी 7 क्रिकेटपटूंना संघातून काढून टाकले. यात युवराज सिंगचाही समावेश आहे. युवराजशिवाय मुंबई इंडियन्सने इव्हिन लुईस, अ‍ॅडम मिल्‍ने, जेसन बेहरेन्डॉर्फ, बरिंद सरान, बेन कटिंग आणि पंकज जयस्वाल यांनाही संघातून वगळले आहे.

म्हणून संघात स्थान नाही
युवराज सिंगला मागील वर्षीच्या लिलावात 4 वेळच्या विजेता असणाऱ्या मुंबई इंडियन्सने १ कोटीच्या बेस प्राइसवर खरेदी केले होते. पण त्याची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही. नंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा देखील केली.

इव्हिन लुईस हा वेस्ट इंडीजचा फलंदाज आहे. पण गेल्या हंगामात त्याची कामगिरी खराब राहिली. अशा परिस्थितीत त्याला संघात स्थान न मिळणे अपेक्षित होते. त्याच वेळी, जेसन बेहरेन्डॉर्फ दुखापतीमुळे ग्रस्त आहे. बरिंदर सरन आणि ऑस्ट्रेलियाच्या बेन कटिंग यांच्या कामगिरीचे प्रदर्शन सुमार राहिले .

या खेळाडूंना वगळता आता मुंबईकडे एकूण 7 खेळाडू शिल्लक आहेत. दोन परदेशी क्रिकेटपटूंचीही जागा रिक्त आहे. 13.05 या रकमेसह, मुंबई पुढील महिन्याच्या लिलावात नवीन बोली लावली जाईल. आज म्हणजे 15 नोव्हेंबर ही आयपीएल 2020 च्या लिलावापूर्वी खेळाडूंना वगळण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे आयपीएलच्या जवळपास सर्व संघांनी बर्‍याच खेळाडूंना काढून टाकले आहे. 3 वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्जने 5 खेळाडूंना काढून टाकले आहे.

Visit : Policenama.com