IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका ! दुखापत झाल्याने ऋषभ पंत एक आठवड्यासाठी बाहेर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दिल्ली कॅपिटल्सचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत एक आठवड्यासाठी आयपीएलमूधन बाहेर झाला. शुक्रवारी त्याला राजस्थान रॉयल्सविरूद्ध मॅच दरम्यान दुखापत झाली होती. रविवारी तो मुंबई इंडियन्सविरूद्ध सुद्धा खेळू शकला नव्हता. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरनुसार पंतला हॅमस्ट्रिंग इंज्यूरी झाली आहे. यामुळे डॉक्टरांनी त्याला आठवडाभर आराम करण्यास सांगितले आहे.

एक आठवड्यानंतर परतणार !
शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरूद्ध मॅचदरम्यान वरुण एरॉनचा कॅच घेतल्यानंतर पंत जखमी झाल्याचे दिसून आले. यामुळे रविवारी मुंबईविरूद्धच्या मॅचमध्ये सुद्धा तो खेळू शकला नाही. रविवारी मुंबई इंडियन्सविरूद्धच्या मॅचनंतर अय्यरने सांगितले की, मी डॉक्टरांशी बोललो, त्यांनी सांगितले की, ऋषभ पंतला एक आठवड्यासाठी आराम करावा लागेल. मला पूर्ण विश्वास आहे की, ब्रेकनंतर तो जोरदार पुनरागमन करेल.

पंत दिल्लीकडून सर्वात जास्त धावा करणारा दुसर्‍या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 35.20 च्या सरासरीने 6 डावांमध्ये 176 धावा केल्या आहेत. मात्र, सध्याच्या सीझनमध्ये तो पुन्हा एकदा अर्धशतक मारू शकलेला नाही. अशावेळी पंत जेव्हा ब्रेकनंतर पुरागमन करेल तेव्हा प्रत्येकाला त्याच्याकडून मोठ्या आणि जबरदस्त खेळीची अपेक्षा असेल.

आयपीएलमध्ये दिल्लीची स्थिती
काल दिल्लीला मुंबईकडून 5 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीची टीम पॉईंट टेबलमध्ये सध्या दुसर्‍या नंबरवर आहे. दिल्लीच्या खात्यात 10 गुण आहेत. दिल्लीने आतापर्यंत 7 पैकी 5 मॅच जिंकल्या आहेत. अशावेळी दिल्लीला प्लेऑफच्या शर्यतीत पोहचणे जास्त अवघड ठरू नये. मुंबईच्या खात्यात सुद्धा 7 मॅचमध्ये 10 गुण आहेत. परंतु, मुंबई नेट रनरेटच्या बाबतीत दिल्लीच्या पुढे आहे.