कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे IPL स्पर्धेपूर्वी BCCI ने घेतला मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही देशात कोरोनाने कहर केला आहे. सातत्याने रुग्णसंख्या वाढत असून या प्रादुर्भावामुळे शासन अनेक राज्यानुसार कडक निर्बध लागू करत आहे. तर यंदाची आयपीएल स्पर्धा ९ एप्रिल पासून सुरु होत असून अलीकडे IPL मधील ३ खेळाडू आणि स्टाफमधील काहींना कोरोनाची लागण झाली असून अशा परिस्थितीत एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावरून आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक मोठी घोषणा केलीय. आयपीएल स्पर्धेतील सगळ्या खेळाडूंना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाशी चर्चा करणार असल्याचे BCCI ने म्हटले आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हे पाहता लसीकरण करणे हाच एकमेव उपाय आहे. कोरोना कधी संपणार हे कुणालाही माहिती नाही. त्यामुळे खेळाडूंचे लसीकरण करणे आवश्यक आहे.’ असे BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले आहे. तर याआधी आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे लसीकरण करण्यात येणार नाही, असे वृत्त आले होते. तसेच राजीव शुक्ला म्हणाले, या विषयावर आरोग्य मंत्रालयाशी संपर्क करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मालिकेच्या दरम्यान भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोरोना लस घेतली होती. परंतु, अद्याप कोणत्याही खेळाडूने लस घेतल्याची माहिती नाही.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या देवदत्त पडिक्कलचा कोरोना रिपोर्ट पॉसिटीव्ह आला आहे. देवदत्त हा कोरोनाची लागण झालेला तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी KKR चा नितीश राणा आणि दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल यांनाही कोरोना झाला आहे. तर चेन्नई सुपर किंग्सच्या कंटेट संघातील एका सदस्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर वानखेडे स्टेडियमधील १० कर्मचारी आणि BCCI ने या स्पर्धेसाठी नेमणूक केलेल्या ६ सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.