IPL MI Vs KKR : जयप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर तुटून पडता 15.50 कोटीचा ‘हा’ फलंदाज, एकाच ओव्हरमध्ये ठोकले 4 ‘षटकार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बुधवारी मुंबई इंडियन्सच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो जसप्रीत बुमराह होता. पहिल्या तीन ओव्हरमध्ये केवळ ५ धावा देऊन २ बळी घेणाऱ्या बुमराहने यापूर्वीच मुंबईसाठी विजय निश्चित केला होता. त्याच्या शानदार गोलंदाजीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण चौथ्या ओव्हरमध्ये बुमराहच्या शेवटच्या गोलंदाजीला पॅट कमिन्सने उध्वस्त केले. होय तोच कमिन्स ज्याला तुम्ही १५ कोटीचा खेळाडू म्हणून ओळखता. जणू काही गोलंदाजीत फ्लॉप झाल्यावर त्याने बुमराहच्या चेंडूंवरच सगळा राग काढला. कमिन्सने बुमराहच्या चौथ्या ओव्हरमध्ये ४ षटकार मारून मुंबई इंडियन्सला हादरवले.

बुमराह हिरोवरून बनला झिरो
सामन्याच्या सोळाव्या ओव्हरमध्ये आंद्रे रसेल आणि नंतर ओयन मॉर्गन सारख्या फलंदाजांना बाद करून बुमराहने मुंबईचा विजय जवळपास निश्चित केला. अखेरच्या ३ ओव्हरमध्ये म्हणजेच १८ चेंडूत कोलकाताला जिंकण्यासाठी ८४ धावांची गरज होती. केकेआरच्या ७ विकेट्स आधीच गेल्या होत्या. अशा परिस्थितीत केकेआरला तिथपर्यंत पोचणे हे अवघड आव्हान होते. रोहितने १८ व्या ओव्हरला चेंडू बुमराहकडे दिला. स्ट्राईकवर पॅट कमिन्स होता. यानंतर बुमराहची अवस्था पाहण्यासारखी होती. पहिल्याच चेंडूपासून कमिन्स त्याच्यावर तुटून पडला. कमिन्सच्या फलंदाजीमुळे स्टेडियममध्ये खळबळ उडाली.

पहिला चेंडू- लाँग लेगच्या वरून पहिला सिक्स
दुसरा चेंडू- डॉट बॉल
तिसरा चेंडू- लॉंग लेगच्या वरून आणखी एक षटकार
चौथा चेंडू- यॉर्कर लेन्थच्या चेंडूला स्वीपर कव्हरच्या दिशेने खेळून २ धावा
पाचवा चेंडू- यावेळी फुलटॉसवर मिड विकेटच्या वरून षटकार
सहावा चेंडू- वाइड बॉल
सहावा चेंडू- आणखी एक फुलटॉस चेंडू आणि आणखी एक षटकार. या वेळी कमिन्सने बुमराहच्या डोक्यावरून षटकार ठोकला.

बुमराहचे हे लाजिरवाणे रेकॉर्ड
या ओव्हरमध्ये बुमराहने २७ धावांची लूट केली. टी-२० कारकीर्दीतील हे त्याचे सर्वात महागडे ओव्हर होते. टी-२० सामन्यात बुमराहच्या एका ओव्हरमध्ये ४ षटकार मारण्याची ही पहिली वेळ होती. पहिल्या तीन ओव्हरमध्ये केवळ ५ धावा खर्च करणाऱ्या बुमराहने आपल्या ४ ओव्हरच्या कोटामध्ये ३२ धावा दिल्या.

पॅट कमिन्सचा पलटवार
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला केकेआरने १५.५ कोटींच्या मोठ्या किंमतीत खरेदी केले आहे. कमिन्स गोलंदाजीत अत्यंत फ्लॉप होता. त्याने पहिला चेंडू वाइड फेकला आणि त्यानंतरच्या त्याच्या पुढच्या चेंडूवर रोहित शर्माने शानदार षटकार लगावला. आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये कमिन्सने १५ धावा दिल्या. कमिन्सने आपल्या ३ ओव्हरमध्ये ४९ धावा खर्च केल्या. त्याचा इकॉनॉमी रेट १६.३३ होता. हा या सामन्यातील कोणत्याही गोलंदाजाचा सर्वात खराब इकॉनॉमी रेट होता. सामन्यादरम्यान कमिन्स सोशल मीडियावर ट्रोल झाला. पण सामन्यात फलंदाजीत त्याचा स्ट्राईक रेट २७५ सर्वोत्तम होता. कमिन्सने केवळ १२ चेंडूंत ३३ धावा ठोकल्या.