IPL 2020 Playoff : 3 टीमचे प्लेऑफमध्ये पोहचणे जवळपास निश्चित, आता एका जागेसाठी 4 दावेदार

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये आतापर्यंत एकुण 43 मॅच झाल्या आहेत. लीगमध्ये आता आणखी 13 मॅच खेळणे बाकी आहेत. हे 13 सामने कोणत्याही लढाईपेक्षा कमी नाहीत. प्रत्येक मॅचचा निकाल टीमसाठी प्लेऑफची अशा जागृत करणारा असेल. म्हणजे पुढील 10 दिवसात सर्व टीममध्ये जोरदार टक्कर दिसेल. प्लेऑफच्या रेसमध्ये सध्या तीन टीम पोहचणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. परंतु, एका जागेसाठी चार टीममध्ये संघर्ष जारी आहे. धोनीची चेन्नई सुपर किंग्ज सध्याच्या सीझनमूधन जवळपास बाहेर गेली आहे. अशा स्थितीत जाणून घेवूयात की प्लेऑफच्या रेसमध्ये कोण पुढे आहे, आणि कोण मागे…

या 3 टीमचे स्थान पक्के!
मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहचणे जवळपास निश्चित आहे. या तिन टीमच्या खात्यात 14-14 गुण आहेत. मुंबईची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये टॉपवर आहे. मुंबईचा नेट रनरेट 1.448 आहे. यानंतर दिल्ली आणि आरसीबीचा नेट रनरेटसुद्धा प्लसमध्ये आहे. दिल्लीच्या टीमला अजून आणखी 3 मॅच खेळायच्या आहेत. तर मुंबई आणि बेंगळुरूच्या टीम 4-4 मॅच आणखी खेळतील. मात्र, या टीमचे शेवटच्या चारमध्ये खेळणे जवळपास निश्चित आहे.

कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान
शनिवारी कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध 59 धावांनी शानदार विजय मिळवल्यानंतर प्लेऑफची आशा आणखी मजबूत केली आहे. केकेआरची ईम सध्या 11 मॅचमध्ये 12 गुणांसह चौथ्या नंबरवर आहे. नेट रनरेटच्या बाबतीत केकेआरची टीम मायनसमध्ये आहे. सध्या केकेआरचा रनरेट -0.476 आहे.

उर्वरित मॅच किंग्ज इलेव्हन पंजाब, चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स सोबत खेळणार आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान
अनिल कुंबळेच्या कोचिंगमध्ये या टीमने कमाल केली आहे. लागोपाठ चार मॅचमध्ये विजय नोंदवल्यानंतर पंजाबची टीम पॉइंट टेबलमध्ये पाचव्या नंबरवर आहे. पंजाबच्या खात्यात सध्या 10 गुण आहेत. उर्वरित मॅच जिंकून पंजाबची टीम थेट प्लेऑफमध्ये सहज पोहचू शकते.

उर्वरित मॅच कुणाविरूद्ध – कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज

सनरायजर्स हैद्राबादची आशा
सनरायजर्सची टीम सध्या सहाव्या नंबरवर आहे. लागोपाठच्या पराभवाने या टीमला खचवले आहे. सनरायजर्सच्या खात्यात सध्या 11 मॅचमधून 8 गुण आहेत. बाकी मॅच सनरायजर्ससाठी जिंकू किंवा मरूची लढाई आहे.

उर्वरित मॅच कुणाविरूद्ध – मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

राजस्थानचे आव्हान
राजस्थान रॉयल्सच्या खात्या सध्या 11 मॅचमधून 8 गुण आहेत. अशावेही त्यांना उर्वरित तीन मॅचशिवाय दुसर्‍या टीमच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

उर्वरित मॅच कुणाविरूद्ध – मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स.