गरीब-उपाशी मुलाला पाहून मन भरून आलं ‘या’ भारतीय क्रिकेटरचं, स्वतःच्या हातानं पाजला चहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बऱ्याचदा क्रिकेटर हे आपल्या चमकदार कामगिरीमुळे चर्चेत येतात मात्र डावखुरा स्पिन गोलंदाज इकबाल अब्दुल्लाह आपल्या उदार मनामुळे सध्या चांगलाच चर्चेत आलेला आहे. इकबाल अब्दुल्लाहचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो मैदानावर भुकेलेल्या मुलाला खाऊ घालत आहे.

सराव करत होता इकबाल
इकबाल सध्या रणजी ट्रॉफी खेळण्यामध्ये व्यस्त आहे. यासाठी तो मैदानावर सराव करत होता अचानक त्याला एक गरीब मुलगा दिसला त्याने त्या मुलाला जवळ बोलावले असता तो भुकेलेला असल्याचे समजले त्यानंतर इकबालने स्वतः त्याच्यासाठी काही पदार्थ मागवले एवढेच नाही तर इकबालने नंतर त्याला स्वतःच्या हाताने चहा देखील पाजला.

कसे आहे इकबाल अब्दुल्लाचे करिअर
इकबाल हा युपीचा राहणार आहे. भलेही इकबालने आतापर्यंत भारतीय संघासाठी डेब्यू केलेला नसेल, परंतु आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत 63 फर्स्ट क्लास सामने, 87 लिस्ट ए सामने आणि 94 टी 20 सामने खेळले आहेत. तसेच इकबालच्या नावे 186 फर्स्ट क्लास विकेट, 121 लिस्ट ए विकेट आणि 81 टी 20 विकेट चा देखील समावेश आहे. आयपीएलमध्ये देखील इकबाल कोलकाता नाइट राइडर्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चैलेंजर्स बैंगलोर या संघासाठी खेळलेला आहे. आयपीएलच्या 49 सामन्यांमध्ये इकबालने 40 विकेट्स देखील घेतलेल्या आहेत. सध्या मात्र इकबाल सिक्कीमसाठी रणजी ट्रॉफी खेळत आहे. सिक्कीमकडुन सर्वाधिक धावा बनवणारा तो एकमेव फलंदाज आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/