वयाच्या 35 व्या वर्षी इरफान पठाणनं घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा वेगवान गोलंदाज इरफान पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शनिवारी स्टार स्पोर्ट्स स्टुडिओमध्ये त्याने आपल्या 15 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला निरोप दिला. तरी तो फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहतील. 35 वर्षीय पठाण म्हणाला की, ‘मी घरगुती क्रिकेटमधील जम्मू-काश्मीर क्रिकेटचा एक भाग आहे. मागील सिजननंतर मी विचार केला कि, पुढे खेळण्याची प्रेरणा काय आहे? तरी भारतीय क्रिकेटमध्ये मी हातभार लावतच राहील, पण आता कुणीतरी माझी जागा घ्यायला हवी. माझ्याकडे बर्‍याच गोष्टी बाकी आहेत आणि मी त्याकडे लक्ष देत आहे.’

इरफान पठाणने भारताकडून 29 कसोटी, 120 वनडे आणि 24 टी -20 सामने खेळले. 9 वर्षे तो भारतीय संघात एक मजबूत दुवा होता. त्याने कसोटीत 100, एकदिवसीय सामन्यात 173 आणि टी -20 मध्ये 28 बळी घेतले. त्याने फलंदाजीतही महत्त्वपूर्ण योगदान दिले. कसोटीत इरफान पठाणने 1105 धावा केल्या ज्यामध्ये 1 शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने 5 अर्धशतकांच्या मदतीने 1544 धावा केल्या. इरफानने टीम इंडियाकडून अखेरचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑक्टोबर 2012 मध्ये खेळला होता.

लेफ्ट हॅन्डेड वेगवान गोलंदाज इरफान पठाण आपल्या स्विंग आणि सीम बॉलिंगमुळे खूप प्रसिद्ध झाला होता. ऑस्ट्रेलियाविरूद्ध अ‍ॅडलेड टेस्टमधून वयाच्या 18 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो प्रथम कसोटी क्रिकेट खेळला. जेव्हा तो नवीन आला, तेव्हा त्याची तुलना वसीम अक्रमशी केली गेली. इरफानची गोलंदाजांची पद्धत अक्रम सारखीच होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like