पाक PM इम्रान खान यांच्यावर भारतीय क्रिकेटपटूंचा हल्ला, म्हटले – ‘दहशतवाद्यांना आसरा देणारा’ आणि ‘द्वेष पसरवणारा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाच्या अनेक बड्या खेळाडूंनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरूद्ध मोर्चा उघडला आहे. इम्रान खानविरूद्ध ट्विटवर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, इरफान पठाण, ऑफस्पिनर हरभजन सिंग आणि माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी ट्विट केले आहे. या सर्व क्रिकेटपटूंनी इम्रान खानला शांततेचा शत्रू आणि ‘द्वेष पसरवणारा’ असे म्हटले होते. संयुक्त राष्ट्रांच्या जनरल असेंब्ली (UNGA ) मधील भाषण दरम्यान पाक पंतप्रधानांनी भारताला अण्वस्त्र युद्धाची धमकी दिली होती. याचाही या खेळाडूंनी समाचार घेतला. पाहुयात काय म्हटले आहे या खेळाडूंनी –

मोहम्मद शमी :
इम्रान खान यांच्याविरोधात ट्विट करत मोहम्मद शमी यांनी म्हटले आहे की, ‘प्रेम, सलोखा आणि शांतीचा संदेश देण्यासाठी महात्मा गांधींनी आपले आयुष्य व्यतीत केले. त्याचवेळी इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर धमकी दिली आणि द्वेष पसरविला. पाकिस्तानला युद्ध आणि दहशतवादाला आश्रय देण्याऐवजी विकास, रोजगार आणि आर्थिक विकासाविषयी बोलणार्‍या नेत्याची गरज आहे.’

हरभजन सिंग आणि इरफान पठाण:
हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनीही इम्रान खान यांच्याविरोधात ट्विट केले. या दोघांनी म्हटले आहे की , ‘संयुक्त राष्ट्रांच्या भाषणादरम्यान भारताला संभाव्य अणुयुद्ध सूचित केले गेले होते. एक मोठा खेळाडू म्हणून इम्रान खानच्या शब्दांमुळे केवळ दोन देशांमधील द्वेष वाढेल. सहकारी खेळाडू म्हणून मी आशा करतो की तो शांततेला चालना देईल.

मोहम्मद अझरुद्दीन :
भारताचे माजी कर्णधार अझरुद्दीननेही UN मधील भाषणाबद्दल इम्रान खानला फटकारले. अझरुद्दीन यांनी ट्वीट केले की, “इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्र संघामधील भाषण ऐकून आम्हाला माहित असलेला हाच तो खेळाडू आहे का असा प्रश्न मला पडला. कोणत्याही खेळाडूकडून याची अपेक्षा कमी नव्हती. मला खरोखर वाटलं होतं की तुम्ही बदल घडवून आणाल आणि पाकिस्तानला दहशतवाद्यांपासून मुक्त कराल.”

गौतम गंभीर:
सर्वप्रथम गौतम गंभीरने इम्रान खानच्या विरोधात ट्विट केले होते. त्याने इमरान खानला दहशतवाद्यांचे रोल मॉडेल सांगितले होते. गंभीरने ट्विट केले होते की, “खेळाडूला एक आदर्श मॉडेल मानले जाते. चांगल्या वागणुकीची, नैतिकतेची, चरित्रातील ताकदीची ते प्रेरणा असतात. अलीकडे आम्ही एक माजी खेळाडू बोलताना देखील पाहिले मात्र ते दहशतवाद्यांचे रोल मॉडेल म्हणून. इम्रान खान यांना क्रीडा समुदायामधून काढून टाकले पाहिजे.”

Visit : Policenama.com