जसप्रीत बुमराहचा टीम इंडियात येताच ‘धुमाकूळ’, यॉर्करनं स्टम्प उडवल्याचा व्हिडीओ व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जवळपास 6 महिन्यांनंतर कमरेच्या स्ट्रेस फ्रॅक्चरमधून रिकव्हर होत क्रिकेटमध्ये वापसी करण्यासाठी तयार आहे. बीसीसीआयनं भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी 20 सीरीजपूर्वी बुमराहचा एक व्हिडीओ सोशलवर शेअर केला आहे. यात बुमराह फुल फॉर्ममध्ये दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी 20 सीरीज 5 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. यातून बुमराह वापसी करणार आहे. पहिला सामना हा गुहावटीमध्ये खेळवला जाणार आहे. यासाठी भारत आणि श्रीलंकेची टीम गुहावटीत पोहोचली आहे. दोन्ही टीमनं तयारी सुरू केली आहे. अशात बीसीसीआयनं बुमराहचा गोलंदाजीचा सराव करतानाचा एक व्हिडीओ सोशलवर शेअर केला आहे. यात दिसत आहे की, बुमराह यॉर्कर लेंथ बॉल टाकतो आहे आणि रबरच्या स्टम्पचा अचून निशाणा साधत आहे. बुमराहनं बॉल टाकल्यानंतर स्टम्प खूप दूरवर जाऊन पडताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये बीसीसीआयनं म्हटलं आहे की, “कोणी हे दृश्य मिस करत होतं का ? जसप्रीत बुमराची ही गोलंदाजी कशी वाटली?” बुमराहचा हा व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे.

बुमराह जुलै-ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे क्रिकेटपासून दूर होता. आता 5 जानेवारी रोजी होणाऱ्या टी 20 सीरीजमधील सामन्यातून तो वापसीसाठी तयार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/