जसप्रीत बुमराह गोव्यात 14-15 मार्चला करणार विवाह, ‘या’ मुलीसोबत घेणार 7 फेरे – रिपोर्ट

नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच विवाहबद्ध होणार आहे. बुमराहने इंग्लंडविरूद्ध चौथी टेस्ट आणि टी 20 सीरीजमधून यासाठी सुट्टी सुद्धा घेतली आहे. मात्र, फॅन्सला हे माहित नव्हते की, अखेर या वेगवान गोलंदाजाची वधू कोण आहे? सोशल मीडियावर सुरू असलेल्या दाव्यानुसार जसप्रीत बुमराह 14 आणि 15 मार्चला विवाह करेल. बुमराह गोव्यात विवाहबद्ध होईल. जसप्रीत बुमराह स्पोर्ट अँकर संजना गणेशन सोबत विवाह करणार आहे.

स्पोर्ट वेबसाइट स्पोर्ट क्रीडाच्या ट्विटनुसार, संजना आणि जसप्रीत बुमराहचा विवाह गोव्यात होईल. संजना आयपीएल अँकर आहे आणि तिने वर्ल्ड कप 2019 सुद्धा कव्हर केला आहे.

संजना गणेशनने इंजिनियरिंग सुद्धा केले आहे. मात्र ती मॉडलिंगकडे वळली आणि 2014 मध्ये ती मिस इंडियाच्या फायनलपर्यंत पोहचली.

संजनाने एमटीव्हीचा रिअ‍ॅलिटी शो स्पिलिट्स विलाद्वारे टीव्हीवर आपला डेब्यू केला होता. संजना गणेशनने 2013 मध्ये फेमिना गॉर्जियसचा किताब जिंकला होता.