ICC World Cup 2019 : ‘या’ कारणांमुळं ‘हिटमॅन’ रोहित ऐवजी केन विल्यमसन बनला ‘मॅन ऑफ द सिरीज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आले. फायनल सामन्यात ज्यावेळी केन विल्यमसन याचे नाव पुकारले गेले त्यावेळी कुणालाही विश्वास बसला नाही. त्याचप्रमाणे केन विल्यमसन यालाही थोडावेळ विश्वास बसला नाही. या स्पर्धेत त्याने १० सामन्यांमध्ये ८२. ५७ च्या सरासरीने ५७८ धावा केल्या. या स्पर्धेत त्याने दोन शतके आणि पाच अर्धशतकाच्या साहाय्याने हि कामगिरी केली. सर्वात जास्त धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्यासाठी त्याने रोहित शर्मा, मिचेल स्टार्क आणि शकिब अल हसन यांना मागे सोडले.

का मिळाला त्याला मालिकावीराचा ‘किताब

ज्यावेळी त्याच्या नावाची घोषणा करण्यात अली त्यावेळी सांगण्यात आले कि, फक्त त्याने धावाच बनवल्या नाही तर आपल्या कर्णधारपदाच्या कौश्यल्याने समोरच्या संघाला चितपट देखील केले. यावेळी आयसीसीच्या स्वतंत्र पॅनलने त्याची या पुरस्कारासाठी निवड केली. त्यामुळे रोहित शर्माने सर्वाधिक धावा काढून देखील त्याला हा किताब मिळाला नाही. रोहित शर्माने या स्पर्धेत सर्वाधिक धावा काढल्या असल्या तरी त्याला सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडता आला नाही. त्याने एका स्पर्धेत ६७३ धावा केल्या होत्या. रोहित शर्माने देखील या स्पर्धेत शानदार कामगिरी करताना १० सामन्यांत ६४८ धावा बनवल्या. यामध्ये त्याच्या ५ शतकांचा देखील समावेश होता. त्याचबरोबर एका वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावण्याचा देखील त्याने पराक्रम केला आहे.

दरम्यान, रोहित शर्माबरोबर बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन हादेखील मालिकावीराच्या किताबाच्या शर्यतीत होता. त्याने ६०६ धावांबरोबरच या स्पर्धेत ११ विकेट देखील घेतल्या होत्या.

 गोरी त्वचा हवी असेल तर करा हे घरगुती उपाय

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

हृदयाच्या रक्तवाहिनी च्या आजारामुळे होतात छातीत वेदना

आरोग्यदायी जीवनासाठी नियमित दूध घ्यायलाच हवे

चांगल्या आरोग्यासाठी जीम मध्ये जाण्यास वेळ नसेल तर ‘हे’ करा

सावधान ! समुद्रात आंघोळ करणार असाल तर हे तुमच्यासाठीच आहे, जरूर वाचा