चाहत्यानं केली KL राहुलसोबतच्या ‘त्या’ फोटोची डिमांड ! अथियानं दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियातील स्टायलिश क्रिकेटर आणि आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा कॅप्टन केएल राहुल (K. L. Rahul) हा बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी (Sunil Shetty) याची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) सोबतच्या नात्यामुळं आणि फोटोंमुळं अनेकदा चर्चेत आला आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या अफेअरची चर्चाही सुरू आहे.

असं असलं तरी केएल राहुल किंवा अथिया यांनी कुणीही नात्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. अलीकडेच अथियाकडे एका चाहत्यानं चक्क केएल राहुल सोबतच्या अनसीन फोटोची डिमांड केली तर ॲक्ट्रेसनं त्याची इच्छा पूर्ण केली.

अथियानं इंस्टावरून चाहत्यांसोबत प्रश्न उत्तराचं एक सेशन घेतलं. यावेळी एका चाहत्यानं अथिायकडे केएल राहुलसोबतच्या एका अनसीन फोटोची मागणी केली. अथियानं देखील आनंदानं ही मागणी पूर्ण केली. यामुळं चाहत्याला खूप आनंद झाला.

अथियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर हिरो या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. 2015 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. अथिया काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत मोतीचूर चकनाचूर सिनेमात दिसली होती. हा सिनेमा खास काही चालला नाही. तिनं मुबारकां, नवाबजादे या सिनेमातही काम केलं आहे.