ICC World Cup 2019 : दक्षिण अफ्रिकेच्या टीमचं मोठं ‘गुपित’ उघड, ‘या’ डीलमुळं खराब कामगिरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्या संघाने मागीलवर्षी एकही मालिका गमावली नाही, त्याचबरॊबर ज्या संघाने या स्पर्धेआधी खेळण्यात आलेल्यापैकी ७६ टक्के सामने जिंकले होते आणि त्यांची सेमीफायनलमधील जागा ही १०० टक्के नक्की होती तो संघ पुन्हा एकदा चोकर्स साबित झाला. हा संघ म्हणजेच दक्षिण आफ्रिका. यावेळी उत्तम प्रदर्शनकरून हि स्पर्धा जिंकण्याची सर्वांना आशा होती, मात्र या संघाने आपल्या खेळणे सर्वांना निराश केले.

या वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने एकूण ९ सामने खेळले. मात्र यामध्ये त्यांना केवळ तीन सामन्यांत विजय मिळवता आला तर पाच सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तर एक सामना रद्द झाला. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत करून निदान संघाची लाज राखली. मात्र या सगळ्या कामगिरीला आणि पराभवाला खेळाडूंबरोबरच एक करार सुद्धा कारणीभूत आहे. या कराराचे नाव आहे कोल्पाक डील. या करारामुळे अनेक खेळाडू इंग्लंडमधील काऊंटी खेळणाऱ्या संघांची खेळण्यासाठी करार करतात. २००४ मध्ये या कराराची सुरुवात करण्यात आली. या करारांतर्गत जगातील १०० देशांच्या खेळाडूंना यूरोपियन यूनियनमधील कोणत्याही देशात जाऊन खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जगभरातील सर्व खेळाडू या कराराचा स्वीकार करून या काऊंटी संघांकडून क्रिकेट खेळतात. त्यामुळे अनेक आफ्रिकी खेळाडू कमी वयातच आपल्या देशाकडून निवृत्ती घेत या संघांकडून खेळण्यास प्राधान्य देतात.

१५ वर्षात ४४ खेळाडूंनी केला करार

आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या ४४ खेळाडूंनी मागील १५ वर्षात हि कोल्पाक करार केला आहे. २०१० पासून ते २०१६ पर्यंत सहा खेळाडूंनी हा करार केला असून २०१६ पासून आतापर्यंत १२ खेळाडूंनी हा करार केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डीविलियर्स याने देखील नुकतीच निवृत्ती स्वीकारली आहे. त्यामुळे तो देखील हा करार करणार असल्याचे बोलले जात होते, मात्र तसे काहीही घडले नाही.

या प्रमुख खेळाडूंचा समावेश

वेन पार्नेल, मॉर्ने मॉर्केल, रिले रॉस, काइल एबॉट, आंद्रे नेल यांसारख्या अनेक दिग्गज आफ्रिकन खेळाडूंनी आपल्या देशापेक्षा या काउंटीमधून खेळण्याला प्राधान्य दिले होते.

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

You might also like