‘या’ खेळाडूनं एका ओव्हरमध्ये केले 31 रन, फॅन्सचं सौरव गांगुलीला घातलं ‘साकडं’, म्हणाले – ‘प्लीज T-20 मध्ये द्या संधी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या देवधर करंडकाच्या अंतिम सामन्यात इंडिया बी चा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतम याने आपल्या फलंदाजीने सर्वांना संमोहित केले. इंडिया सी च्या विरोधात त्याने अंतिम षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. त्याने 49 व्या षटकात 31 धावा ठोकल्या, ज्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता.

गौतमाची स्फोटक फलंदाजी
कृष्णप्पा गौतम याने मध्यमगती गोलंदाज दिवेश पठानिया याच्या एका षटकात 31 धावा ठोकल्या. या षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने चौकार मारला. मात्र हा चेंडू नोबॉल होता. त्यानंतर फ्रीहिटवर त्याने षटकार खेचला. दुसरा चेंडू व्हाईड पडला. तर तिसरा चेंडूवर त्याने शानदार चौकार मारला. चौथ्या चेंडूवर त्याने षटकार खेचला. तर शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार खेचत गौतमाने एका षटकात 31 धावा वसूल केल्या. त्याच्या खेळीत त्याने 10 चेंडूत 35 धावा केल्या. अशाप्रकारे त्याने आपल्या संघाला 50 षटकांत 283 धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानंतर आता सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात झळकत असून त्याच्या चाहत्यांनी त्याचा समावेश पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये करण्याची मागणी केली आहे.

केदार जाधव याचे शानदार अर्धशतक
कृष्णप्पा गौतम याच्या धमाकेदार खेळीआधीकेदार जाधव याने शानदार अर्धशतकी खेळी करत आपल्या संघाला समाधानकारक धावसंख्या उभारण्यास मदत केली. 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने त्याने शानदार 86 धावांची खेळी आहे. त्याने देवधर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत 14 सामन्यांत 711 धावा केल्या असून यामध्ये 1 शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. केदार जाधव यांच्याबरोबरच यशस्वी जायसवाल याने 54 धावांची खेळी केली आहे.

Visit : Policenama.com