‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडणार, निवृत्तीनंतर जाणार ‘या’ देशात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रीलंकेचा विश्वविजेता माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा देश सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. त्याला ऑस्ट्रेलियामध्ये कायमस्वरूपी राहण्याची परवानगी मिळाली असून तो आपल्या कुटुंबासह तिथे राहण्याचा विचार करत आहे.

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत लसित मलिंगा खेळणार असून त्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेईल अशी चर्चा आहे.

मलिंगा बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल अशी चर्चा सुरु आहे.

मलिंगाचे वय 35 असून तो प्रशिक्षक म्हणून यापुढे क्रिकेटमध्ये राहणार असल्याचं समजतं. ऑस्ट्रेलियात कोणत्याही संघाचा तो प्रशिक्षक होऊ शकतो असं म्हटलं जात आहे.

वय आणि दुखापतींमुळे त्रासलेला मलिंगा यापुढे निवृत्तीनंतर प्रशिक्षक म्हणून काम करणार आहे. मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्याच्याकडे अनुभव देखील आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात देखील त्याला प्रशिक्षक म्हणून काम मिळू शकते. त्यामुळे तो कायमस्वरूपी ऑस्ट्रेलियात स्थलांतरित होणार आहे. या वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेला चांगली कामगिरी करता आली नव्हती.

मलिंगाने याआधी 2018 मध्ये मुंबई इंडियन्सचा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. त्यानंतर 2019 मध्ये तो खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता.

या संपूर्ण स्पर्धेत श्रीलंकेचा संघ सूर सापडण्याचा प्रयत्न करता होता. मात्र अखेरच्या सामन्यापर्यंत त्यांना तो सापडला नाही. त्यामुळे ते लवकरच स्पर्धेतून बाहेर पडले.

लंकेकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये 335 विकेट घेण्याची कामगिरी त्याच्या नावावर आहे. याशिवाय कसोटीत 101 तर टी20 मध्ये त्याने 97 विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान, मलिंगाने श्रीलंकेसाठी आतापर्यंत एकदिवसीय सामन्यात ३३५ विकेट तर कसोटी सामन्यात १०१ विकेट तर टी-२० सामन्यात ९७ विकेट घेतल्या असून श्रीलंकेच्या महत्वाच्या गोलंदाजांपैकी एक तो आहे.

आरोग्यविषयक वृत्त –