138 चेंडूत 350 धावा करणाऱ्या ‘या’ फलंदाजाने स्वतःला IPL पासून ठेवलं दूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलमध्ये खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते कारण या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही चमकलात तर तुम्हाला लगेच देश पातळीवर संधी मिळते परंतु एक खेळाडू असा देखील आहे ज्याने स्वतःला आयपीएल पासून दूर ठेवले आहे. 2020 मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या सीझनपासून लियाम लिविंगस्टोन या खेळाडूने स्वतःला दूर ठेवलेले आहे. लियाम दोन वर्षांपासून इंग्लंडच्या संघाबाहेर आहे. इग्लंडसाठी खेळणारा लियाम लिविंगस्टोन हा गेल्या आयपीएल मध्ये राजस्थान रॉयलकडून खेळाला होता. परंतु काउंटी क्रिकेटमध्ये खेळून त्यांनी इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता.

138 चेंडूत बनवल्या होत्या 350 धावा
2017 मध्ये इंग्लंडच्या संघातून लियाम ने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तेव्हापासून एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली होती. 2015 मध्ये एका क्लबसाठी खेळताना त्याने 138 चेंडूत 350 धावा केल्या होत्या. यावेळी केलेल्या धुव्वाधार फलंदाजीमुळे सगळ्यांच्या नजरा लियाम यांच्यावर पडल्या होत्या.

राजस्थान रॉयल मधील कारकीर्द
लियाम लिविंगस्टोन ने गेल्या आयपीएलच्या सीझनमध्ये राजस्थान रॉयलसाठी चार सामने खेळले होते. यामध्ये उत्तम कामगिरी या खेळाडूने केली होती. मात्र आपल्याला इंग्लंडच्या कसोटी संघात स्थान मिळवायचे आहे यासाठी आपण काऊंटी क्रिकेट खेळात असल्याचे लियाम यांनी स्पष्ट केले होते. तसेच आयपीएलमधील राजस्थान रॉयल सोबत खेळाचा अनुभव उत्तम होता तसेच यावेळी घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी आनंददायक होता असे लियाम म्हणाला होता.

एक नजर लियामच्या करिअरवर
26 वर्षीय लियाम ने इग्लंडसाठी दोन टी 20 सामने खेळलेले आहेत ज्यात त्याला केवळ 16 धावा बनवता आल्या. त्याव्यतिरिक्त त्याने 54 पहिल्या श्रेणीतील सामन्यांमध्ये 41.61 च्या सरासरीने 2955 धावा, लिस्ट ए च्या 55 सामन्यांमध्ये 1552 धावा बनवलेल्या आहेत. या खेळाडूचे विशेष म्हणजे छोट्या मोठ्या श्रेणीतील सामन्यात याने उत्तम कामगिरी केलेली आहे.

Visit :  Policenama.com