IPL 2020 मध्ये मोठा बदल ! जाणून घ्या यावेळी कधी सुरु होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इंडियन प्रीमियर लीग बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय या वर्षीच्या आयपीएल बाबत एक नवीन घोषणा करू शकते. जर असे झाले तर पुढील वर्षी होणारा आयपीएलचा 13 वा सिझन अधिक काळासाठी पहायला मिळू शकतो. कारण बीसीसीआय पुढील वर्षी होणाऱ्या सीझनमध्ये डे नाईट सामने वाढवण्याच्या निर्णयावर गांभीर्याने विचार करत आहे. गेल्या पर्वामध्ये रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाने महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता.

येणाऱ्या आयपीएलसाठी आयोजक एका दिवशी एकाच सामना ठेवण्याचा विचार करत आहेत त्यामुळे असे झाल्यास हे पर्व 60 दिवस चालू शकेल. अशा प्रकारचा अहवाल आईपीएल गव्हर्निंग काउंसिलकडे पाठवण्यात आला आहे. 1 एप्रिल पासून पुढील वर्षीच्या आयपीएलच्या पर्वाला सुरुवात होऊ शकते. तर 30 मे रोजी या पर्वाची सांगता होऊ शकते. सर्व संघांनादेखील याबाबतची माहिती लवकरच दिली जाणार आहे.

सात वाजता सुरु होणार सामने –
यावेळी सायं. सात वाजल्यापासून सामने सुरु करण्याचा विचार देखील सामन्यांचे आयोजक करत आहेत. या आधी सामन्यांना आठ वाजता सुरुवात होत असे. मात्र असे करण्याला मुंबई इंडियन्स संघाने विरोध दर्शवला आहे. त्यांनी दिलेल्या कारणानुसार सामने पाहण्यासाठी जास्त वर्ग हा नोकरदार असतो त्यामुळे काम संपून सात नंतर तो कार्यालयातून निघून सामन्यांसाठी येतो. मात्र सामन्यांच्या वेळेत बदल केल्यास याप्रकारच्या प्रेक्षकांबाबत मोठा फरक पडू शकतो.

रात्री 1:30 ला संपला होता सामना –
मागील पर्वामध्ये बीसीसीआयने कोणताही बदल केला नव्हता. मात्र बाद फेरीचे सामने लवकर सुरु झाले होते. मात्र बँगलोर मध्ये एक सामना रात्री 1:30 वाजेपर्यंत चालला होता त्यावेळी अनेकांनी उशिरा रात्री पर्यंत सामने न खेळवण्याबाबत विचार व्यक्त केला होता.

लवकर सुरुवात करण्यासाठी जास्त संघांची सहमती –
सामना उशिरा संपल्याने प्रेक्षकांना घरी जायला देखील खूप उशीर होतो त्यामुळे अधिक संघ सामने लवकर सुरु करण्याच्या निर्णयाला समर्थन देत आहेत.

45 दिवसांऐवजी 60 दिवस चालणार सामने –
जर आईपीएल गव्हर्निंग काउंसिलने हा निर्णय मान्य केला तर साठ दिवस हे पर्व चालणार आहे. विशेष म्हणजे एप्रिल आणि ममे महिन्यात हे सामने होणार आहेत आणि यावेळी उन्हाळ्याचे वातावरण असते म्हणून आयोजक जास्त तर सामने रात्री घेण्याच्या विचारात आहे.

15 दिवसांच्या ब्रेकबाबत देखील चर्चा –
आयपीएलच्या पर्वानंतर भारतीय संघाच्या पुढील आंतरराष्ट्रीय दौऱ्यामध्ये 15 दिवसांचा कालावधी असावा याबाबत देखील विचार केला जाऊ शकतो. कारण इतर देशांच्या आयोजकांनी खेळाडूंच्या आरामासाठी हा विचार केल्याचे पहायला मिळाले होते.

Visit  :Policenama.com