IPL 2020 : ‘स्टुअर्ट बिन्नी-मयंती लँगर’ यांच्या घरी आली आनंदाची बातमी, दिला ‘गोंडस’ मुलाला जन्म

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या क्रीडा अँकर्सची नावे जाहीर झाली तेव्हा सर्व चाहते आश्चर्यचकित झाले होते. वास्तविक ब्रॉडकास्टर स्टार नेटवर्कने मयंती लँगरचे नाव अँकर्सच्या यादीत समाविष्ट केलेले नव्हते. आता आयपीएल 2020 मधून मयंती लँगरच्या माघारचे कारण समोर आले आहे. वास्तविक मयंती लॅंगर आई बनली आहे. मयंती लँगर भारतीय क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीच्या पत्नी आहेत. मयंती लँगरने स्टुअर्ट बिन्नीसोबत तिच्या मुलाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मयंती लॅंगरने सोशल मीडियावर सांगितले की, ती 6 आठवड्यांपूर्वीच आई बनली आहे.

मयंती लॅंगर आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी 2012 मध्ये लग्न केले होते. मयंती लॅंगरने फुटबॉल आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धा होस्ट केल्या आहेत. त्यांनी आयपीएलमध्येही जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याचबरोबर, स्टुअर्ट बिन्नीने भारताकडून 6 कसोटी सामने, 14 एकदिवसीय सामने आणि 3 टी-20 सामने खेळले आहेत.

मयंती लॅंगरच्या अनुपस्थितीत स्टार स्पोर्ट्सने काही नवीन महिला अँकर्सला त्यांच्या संघात स्थान दिले आहे. ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध टीव्ही प्रेझेंटर नेरॉली मीडोज या स्पर्धेचे होस्टिंग करताना दिसणार आहे. याशिवाय सुरेन सुंदरम, कीरा नारायणन, नशप्रीत कौर, तान्या पुरोहित यांनाही अँकरिंगची संधी मिळणार आहे.