ICC World Cup 2019 : पत्नीनंतर ‘या’ युवतीकडून मोहम्मद शमीवर ‘गंभीर’ आरोप, ‘त्या’ मॅसेजचे टाकले ‘स्क्रीनशॉट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर पुन्हा एकदा एका महिलेने आरोप केले आहेत. या महिलेने आरोप केलेल्या मॅसेजचा स्क्रिनशॉट ट्विट करत शमिवर गंभीर आरोप केले आहेत. सोफिया असे या महिलेचे नाव असून तिने आरोप करताना म्हटले आहे कि, १.४ मिलियन फॉलोअर असणारा क्रिकेटर मला का मॅसेज करत आहे ? असा प्रश्न विचारात तिने त्यावर आरोप लावले आहेत. या ट्विटर हॅन्डलने दिलेल्या माहितीनुसार, शमी दररोज त्या महिलेला गुड आफ्टरनून असे मॅसेज पाठवत असे.

सध्या इंग्लंडमध्ये खेळवण्यात येत असलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत मोहम्मद शमी शानदार कामगिरी करत असून अफगाणिस्तानविरुद्ध त्याने शानदार हॅट्रिक नोंदवत इतिहास रचला होता. मात्र एकेकाळी शमी आणि त्याच्या परिवाराला संपूर्ण देशापुढे मान खाली घालावी लागली होती. त्याची पत्नी हसीन जहां हिने त्याच्यावर आणि कुटुंबियांवर मारहाणीचे आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. शमीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचा आरोप करत तिने पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अद्याप तपास सुरु असून मोठ्या मानसिक त्रासाला समोर जावे लागल्यानंतर देखील मोहम्मद शमीने आपल्या कामगिरीवर याचा कोणताही परिणाम होऊ न देता चांगला खेळ केला.

दरम्यान, या स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनल सामन्यात पहिल्या दिवशी न्यूझीलंडने फलंदाजी करताना ४६ षटकात ५ बाद २११ धावा केल्या असून काल पावसामुळे सामना थांबवण्यात आल्यानंतर आज हा सामना पुढे खेळवला जाणार आहे.

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय

Loading...
You might also like