MS धोनीचे ‘ते’ 7 अनोखे रेकॉर्ड जे शक्यतो कधीही नाही मोडणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येक भारतीय व्यक्तीला 15 ऑगस्ट ही तारीख स्वातंत्र्यदिन म्हणून लक्षात राहते, पण आता याच तारखेची क्रिकेट विश्वाच्या ऐतिहासिक तारखांमध्ये नोंद होणार आहे. तो दिवस ज्या दिवशी आपली कारकीर्द गाजवणारा भारतीय कर्णधार धोनीने क्रिकेटपासून निवृत्ती घेतली. 16 वर्षांचं ते करियर… 500 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने आणि 17 हजार पेक्षा अधिक धावा, कॅप्टन, विकेटकीपिंग, फलंदाजी असे सर्व ठिकाणी त्याने कामगिरी केली.

रेकॉर्डमन धोनी
16 वर्षांच्या लांब कारकीर्दीमध्ये धोनीने फलंदाज, कॅप्टन, अशा विविध पदांवर त्याची विशेष कामगिरी बजावली. मग ते त्याचे षटकार असोत किंवा कॅप्टन असतानाचे त्याचे निर्णय असोत.धोनीच्या नावावर विशेष असे 7 रेकॉर्ड्स आहेत, ते मोडणे म्हणजे मोठे आव्हान आहे.

1. चेस करत जिंकणे – टार्गेट लक्षात घेऊन खेळणे मोठे जिकिरीचे काम असते पण धोनी संयम ठेवत खेळायचा. धोनी आत्तापर्यंत 47 वेळा नाबाद राहात खेळाला. हा रेकॉर्ड धोनीच्या नावावर आहे.

2. षटकार मारत विजय – शेवटच्या ओवर पर्यंत मॅच ला घेऊन जाण्याची सवय धोनीला होती. 9 वेळा त्याने षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला.

3. सगळ्यात जास्त स्टम्पिंग – वनडे मध्ये धोनीने 123 फलंदाजांना स्टम्पिंग केलं आहे. हा वनडे मधला सगळ्यात मोठा रेकॉर्ड आहे. टी-20 मध्ये त्याने 34 स्टम्पिंग केले, हा देखील जागतिक विक्रम आहे.

4. रन आउट – धोनी त्याच्या पहिल्या आणि शेवटच्या दोन्ही मॅच मध्ये रनआऊट झाला होता. 2004 मध्ये बांग्लादेश विरुद्ध खेळताना पाहिल्यांदा रन आऊट झाला होता. धोनी मागच्या वर्षी न्यूझीलंड विरुद्ध रन आऊट झाला होता.

5. सगळ्यात जास्त रन – एक विकेटकीपर, कॅप्टन असणाऱ्या धोनीने 6641 रन काढले. कोणत्याही क्रिकेटरने अशी कामगिरी केली नाही.

6. सर्वात जास्त सामन्यात कॅप्टन – धोनी 16 वर्षांच्या कारकिर्दीत 332 मॅच मध्ये कॅप्टन होता. ज्यामध्ये 200 वनडे, 72 टी-20, 60 टेस्ट मॅच होत्या. दुसऱ्या नंबरवर रिकी पॉंटिंग आहे तो 324 मॅच मध्ये कॅप्टन होता.

7. सर्वात जास्त आयसीसी ट्रॉफी – धोनी कॅप्टन असताना भारताला 3 टोर्नामेंटमध्ये विजय मिळाला. असा रेकॉर्ड अन्य कोणीही बनवला नाही.