Coronavirus : वर्षाला 800 कोटींची ‘कमाई’ करणार्‍या MS धोनीनं ‘कोरोना’ पिडीतांसाठी फक्त 1 लाखाचं केलं ‘दान’, चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोनाव्हायरसमुळे जगभरात 23 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात या साथीच्या आजाराची लागण झालेल्या लोकांची संख्या 600 च्या वर गेली आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी, देश आणि परदेशात अनेक नामांकित व्यक्ती मदतीसाठी पुढे आल्या आहेत. सध्याच्या भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूंनी अद्याप कोणतीही मोठी ऑफर दिली नसली तरी माजी फलंदाज सचिन तेंडुलकर आणि अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने पीडितांच्या मदतीसाठी हात पुढे केले आहेत.

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे भारतामध्ये 21 दिवसांचा लॉकडाउन आहे, जो 14 एप्रिलपर्यंत चालेल. ज्यामुळे सर्व काही ठप्प झाले आहे, त्याचा थेट परिणाम रोजंदारीवरील मजुरांवर आणि त्यांच्या कुटुंबावर होतो. देशात सर्वाधिक 120 रुग्ण महाराष्ट्रात, विशेषत: मुंबई आणि पुण्यातून नोंदविण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत महेंद्रसिंग धोनी यांनी पुण्याच्या रोजंदारीवरील मजुरांसाठी एक लाख रुपयांची देणगी दिली आहे. धोनीच्या आर्थिक मदतीबद्दल त्याचे चाहते सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. चाहत्यांनी म्हटले आहे की, वार्षिक 800 कोटी रुपये मिळविणार्‍या धोनीने केवळ एक लाख रुपयांची मदत करणे खेदजनक आहे. त्याच वेळी सचिन तेंडुलकरने महाराष्ट्र सरकार व पंतप्रधान मदत निधीला 25-25 लाख रूपयांची देणगी दिली आहे.

रेशनचे सामान देण्यात येईल
महेंद्रसिंग धोनी यांनी ही रक्कम मुकुल माधव फाऊंडेशन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला क्रोड फंडिंग वेबसाइटच्या माध्यमातून दान केली आहे. या रकमेचा उपयोग पुणे येथील दैनंदिन वेतन मजुरांच्या कुटुंबीयांना रेशन वस्तू पुरवण्यासाठी केला जाईल. धोनीची पत्नी साक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही लिंक शेअर केली आहे. धोनीच्या पुढाकारानंतर आणखी बरेच लोक मदतीसाठी पुढे आले असून आतापर्यंत 12 लाख रुपये उभे केले आहेत.

पुण्याशी धोनीचे हे आहे नाते
पुण्याच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसाठी एमएस धोनी यांनी दान का दिले, हा प्रश्नही लोकांच्या मनात निर्माण होत आहे. वास्तविक, धोनी 2016 आणि 2017 मध्ये आयपीएलच्या दोन हंगामात राइजिंग पुणे सुपरगिजंट्सचा भाग होता. त्यावेळी दोन वर्षे चेन्नई सुपर किंग्जवर बंदी घालण्यात आली होती. 2016 मध्ये धोनीने पुण्याचे नेतृत्व केले होते, तर पुढच्या मोसमात स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात तो खेळला.

सचिन तेंडुलकरने दिले 50 लाख रुपये
टीम इंडियाचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकरसुद्धा कोरोना व्हायरसग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे. त्याने एकूण 50 लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्यापैकी त्याने महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री मदत निधीला 25 लाख रुपये, तर पंतप्रधान मदत निधीला 25 लाख रुपये दिले आहेत. दरम्यान, सौरव गांगुली, इरफान आणि युसुफ पठाण यांनीही गरजूंना मास्क वाटले आहेत.