महेंद्रसिंह धोनीच्या हाताला गंभीर ‘जखम’, ‘या’ कारणामुळं भारतीय लष्करापासून देखील ‘लपवलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी कर्णधार आणि खेळाडू महेंद्रसिंह धोनी याने दोन महिने क्रिकेटमधून विश्रांती घेतली असून या कालावधीत तो भारतीय सैनिकांबरोबर काश्मीरमध्ये असून लष्कराबरोबर काम करत आहे. धोनी मागील महिन्यात १०६ TA या बटालियनमध्ये रुजू झाला असून काश्मीर खोऱ्यात पहारा देण्याचे काम तो करत आहे. १५ ऑगस्टपर्यंत तो या ठिकाणी राहणार असून सध्या तो लष्कराची सेवा करत आहे.
MSD-2
मात्र आता धोनीविषयी एक महत्वाची बातमी समोर येत असून वर्ल्डकप दरम्यान धोनीच्या अंगठ्याला दुखापत झाल्याची बातमी समोर आली होती. यामध्ये तो रक्त थुंकताना दिसून येत होता. मात्र आता अधिकृत माहिती समोर येत आहे कि, धोनीच्या अंगठ्याबरोबर त्याच्या बोटाला देखील जखम झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याच्या बोटाला इजा झाली होती. मात्र त्यानंतर देखील स्पर्धेत तो खेळात राहिला. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार हि जखम गंभीर असून त्याला शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे.
MSD3
जखमेला लपविण्याचा होता प्रयत्न
हि गंभीर जखम झाल्यानंतर देखील उर्वरित सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी संघातील देखील कुणालाही याची माहिती दिली नव्हती. त्याचबरोबर बोटाचे स्कॅन देखील केले नव्हते. त्याला भारतीय सैन्यात जायचे असल्याने देखील त्याने हि जखम लपवली असल्याचे बोलले जात आहे. धोनी या ठिकाणी १५ ऑगस्ट पर्यंत राहणार असून धोनी निवृत्ती घेण्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र धोनी हा पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपपर्यंत धोनी खेळणार असून त्यानंतर तो निवृत्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर १५ ऑगस्ट रोजी धोनीच्या हस्ते झेंडावंदन होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

आरोग्यविषयक वृत्त