भारत-पाकिस्तान सीमेवर ‘बंदुकी’सह दिसला MS धोनी

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेटच्या मैदानापासून लांब असलेला एम एम धोनी कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी सतत चर्चेत असतो. आता धोनीचे काही फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामध्ये धोनी जवानाच्या वर्दीमधे बसलेला असून त्याच्याकडे एक बंदूक देखील असल्याचे दिसत आहे. तसेच सोबत एक लष्कराचा जवान देखील आहे.

काश्मीरच्या ट्रेनिंग दरम्यानचा आहे हा फोटो
धोनी ज्यावेळी काश्मीरमध्ये ट्रेनिंगसाठी गेला होता त्यावेळचे हे फोटो आहेत. विश्वकप झाल्यानंतर धोनी लष्कराच्या ट्रेनिंगसाठी काश्मीरला गेला होता. 31 जुलै 2019 ते 15 ऑगस्ट दरम्यान तो सैन्यात होता. लेफ्टनंट कर्नल असलेल्या धोनीने 106 व्या टेरिटोरियल आर्मी बटालियनसह प्रशिक्षण घेतले होते, ज्यात त्याने रक्षक, पोस्ट ड्यूटी आणि गस्त देणे यासाठी ड्युटी केली होती. धोनीने 15 ऑगस्ट रोजी लडाखमध्ये तिरंगा फडकावला आणि त्यानंतर ते सियाचीन वॉर मेमोरियललाही गेले.

भारतीय संघातून बाहेर आहे धोनी
अनेक दिवसांपासून धोनी भारतीय संघातून बाहेर आहे. धोनीने शेवटचा सामना न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनलसाठी खेळाला होता. मात्र त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, वेस्टइंडीज आणि श्रीलंका या दौऱ्यामध्ये धोनी खेळाला नव्हता. यानंतर धोनीला करारामधून देखील बाहेर करण्यात आले.

आयपीएलमधून करणार पुनरागमन
धोनी आयपीएलमधून पुनरागमन करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. तसेच रवी शास्त्री यांनी सांगितले आहे की, धोनीने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तर धोनीला संघात घेण्याबाबत पुनर्विचार केला जाऊ शकतो. अनेकांना असे वाटते की धोनी आता निवृत्ती घेणार आहे मात्र धोनीने अशाप्रकरचे कोणतेही संकेत अद्याप दिलेले नाही.

फेसबुक पेज लाईक करा –