मोठा खुलासा ! महेंद्र सिंह धोनी क्रिकेटच्या ‘पिच’वरून आता बॉलिवूडच्या ‘ट्रॅक’वर, सिनेमात करणार ‘हे’ काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्डकपमधील न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सेमीफायनलमधील दारुण पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीची चर्चा रंगत आहे. मात्र त्याने अजूनपर्यंत निवृत्ती जाहीर केलेली नाही. त्याने क्रिकेटमधून दोन महिन्याचा ब्रेक घेतला असून नुकताच तो जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची सेवा करून परतला आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी देखील त्याची संघात निवड झालेली नाही. त्यामुळे तो पुढे कोणते पाऊल उचलणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांबरोबरच अनेक जणांना पडला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून देखील त्याने स्वतःच माघार घेतली असल्याचे बोलले जात आहे. याआधी तो विंडीज दौऱ्यावर देखील गेला नव्हता. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, धोनी लवकरच मोठा निर्णय घेणार असून तो बॉलिवूडमध्ये गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात तो लवकरच घोषणा करणार आहे. तो चित्रपट क्षेत्रात निर्माता म्हणून आपली नवीन कारकीर्द सुरु करणार असून त्याने यासंदर्भात अनेक निर्मात्यांशी चर्चा सुरु केल्याची माहिती मिळत आहे. धोनीला सुरुवातीपासूनच चित्रपटांचे आकर्षण असून यामार्फत तो आपली आवड पूर्ण करणार आहे.

जॉन अब्राहम सोबत करणार आहे पहिला प्रोजेक्ट
नीरज पांडे याने धोनीच्या आयुष्यावर एका सिनेमा बनवला होता. त्याच दरम्यान धोनीला या क्षेत्रातील गोष्टी समजण्यास देखील मदत झाली. त्यामुळे तो आता या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम हा धोनीचा चांगला मित्र असून तो त्याच्याबरोबर मिळून पहिल्या प्रोजेक्टवर काम करणार आहे. मात्र याबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

टी-20 वर्ल्डकप पर्यंत खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट
न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सेमीफायनलमधील दारुण पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीची चर्चा रंगत आहे. मात्र त्याने अजूनपर्यंत निवृत्ती जाहीर केलेली नाही.मात्र निवड समितीने त्याला पुढील वर्षी ऑस्ट्रेलियायात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपपर्यंत निवृत्त न होण्यासाठी राजी केले आहे. त्यामुळे आता तो पुढील वर्षापर्यंत खेळत राहणार आहे.
आरोग्यविषयक वृत्त –