MS धोनीबाबत मोठी बातमी ! ‘टीम इंडिया’मध्ये परतण्यासाठी करतोय ‘अशी’ तयारी, समोर आला ‘हा’ व्हिडिओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन एमएस धोनी खूप दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. या वर्षी झालेल्या विश्वकप सेमीफायनल सामन्यात भारताला न्यूझीलंड सोबत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र आता धोनी पुन्हा क्रिकेट टीममध्ये परतणार असल्याचे समजते.

सोशल मीडियावर व्हायरल झाला धोनीचा व्हिडीओ
महेंद्र सिंह धोनीचा एक मैदानावरचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धोनी नेट प्रॅक्टिस करताना दिसतो. जेएससीए स्टेडियमवरील हा व्हिडीओ आहे. धोनी या स्टेडिअमवर उद्घाटनासाठी आला होता. यानंतर धोनीने तेथील युवा खेळाडूंसोबत नेटमध्ये सराव केला. याच सरावाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या आधी हे मैदान केवळ काळ्या मातीचेच होते. मात्र धोनीने सांगितल्यानंतर काळ्या आणि लाल मातीने या ठिकाणी खेळपट्टी बनवण्यात आली. क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर धोनी रांचीमध्ये आपाल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या रांची मधील कसोटी सामन्यावेळी धोनी ड्रेसिंग रूममध्ये सुद्धा आढळून आला होता. सध्याची त्याची तयारी पाहून तो लवकरच पुनरागमन करेल अशी सर्वांना आशा आहे.

Visit : Policenama.com