‘2023 वर्ल्ड कप’ पर्यंत खेळू शकतो MS धोनी, भारताला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ बनवणार्‍या खेळाडूचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एमएस धोनी (MS Dhoni) २०१९ च्या विश्वचषक उपांत्य फेरीनंतर टीम इंडियाच्या ब्लू जर्सीमध्ये दिसला नाही. असे मानले जात आहे की धोनी क्वचितच भारतीय संघात परत येईल, परंतु माजी भारतीय क्रिकेटपटू वेणुगोपाल राव (Venugopal Rao) यांचे वेगळेच म्हणणे आहे. वेणुगोपालने एका मुलाखतीत सांगितले की, धोनी २०२० टी -२० विश्वचषक नव्हे तर २०२३ वर्ल्ड कपपर्यंत खेळू शकतो. त्यांच्या मते महेंद्रसिंग धोनीमध्ये अजून बरेच क्रिकेट बाकी आहे.

धोनीबाबत वेणुगोपाल यांचे मोठे विधान
एका वृत्तवाहिनीशी बोलताना वेणुगोपाल राव यांनी धोनीबाबत सांगितले की, ‘२०२३ मध्ये होणारा वर्ल्ड कपदेखील त्यांनी खेळला पाहिजे, असे मला वाटते. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेसाठी तो खूप महत्वाचा खेळाडू आहे. मला माहित आहे की २०१९ च्या विश्वचषक उपांत्य सामन्यापासून तो खेळला नाही. परंतु परत येणे त्याच्यासाठी अजिबात अवघड नाही. तो धोनी आहे. धोनीला अशा परिस्थितींचा सामना कसा करावा हे चांगलेच माहित आहे. वेणुगोपाल राव पुढे म्हणाले, धोनीने आयसीसीचीच्या सर्व ट्रॉफी जिंकल्या आहेत. कर्णधार असो की यष्टीरक्षक किंवा फलंदाज कोणीही धोनीच्या आसपास नाही. माझ्या मते धोनीने २०२३ वर्ल्ड कपपर्यंत खेळले पाहिजे.’

धोनी करणार आईपीएलमधून वापसी
धोनी जवळपास ८ महिन्यांपासून मैदानाच्या बाहेर आहे, तथापि पुढच्या महिन्याच्या अखेरीस तो आयपीएल खेळताना दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार धोनी १ मार्चपासून चेन्नई येथे आयपीएल २०२० च्या सिजनची तयारी सुरू करणार आहे. आयपीएलची सुरुवात २९ मार्चपासून होत आहे आणि या सीजनचा सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे.

२०१९ मध्ये वेणुगोपाल झाले निवृत्त
वेणुगोपाल राव गेल्या वर्षी निवृत्त झाले. त्यांनी भारताकडून १६ एकदिवसीय सामने खेळले. वेणुगोपाल राव यांनी प्रथम श्रेणी सामन्यात ७ हजाराहून अधिक धावा केल्या होत्या. त्याचबरोबर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे ४००० हून अधिक धावा आहेत. तथापि, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांच्या कौशल्याला ते न्याय देऊ शकले नाही आणि त्यांची फलंदाजीची सरासरी फक्त २४.२२ इतकी होती. वेणुगोपाल राव सन २००० मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील विश्वचषक संघातही सहभागी झाले होते. या विश्वचषकात टीम इंडियाचा कर्णधार मोहम्मद कैफ होता आणि त्यात युवराज सिंगही खेळला होता. ही स्पर्धा भारताने जिंकली होती.