‘कॅप्टन कूल’ MS धोनी आज संध्याकाळी 7 वाजता निवृत्‍ती जाहीर करणार ?, सोशल मिडीयावर सर्वत्र ‘रिटायरमेंट’चा ‘कल्‍ला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि माजी कर्णधार एमएस धोनीच्या निवृत्तीची बातमी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारताला टी- 20 आणि विश्वचषक जिंकून देणारा कॅप्टन कूल आज संध्याकाळी सातच्या सुमारास नवृत्तीची घोषणा करणार असल्याचा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. धोनी आज संध्याकाळी सातच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन निवृत्ती जाहीर करणार असल्याचे मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे.

विराट कोहलीच्या एका ट्विटमुळे धोनी निवृत्ती घेणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. विराट कोहलीने गुरुवारी केलेल्या ट्विटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत धोनीसमोर विराट नतमस्तक झाल्याचे दिसत आहे. कोहलीने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे की, ‘हा सामना मी कधीच विसरू शकणार नाही, खास करून ती रात्र, या व्यक्तीने मला फिटनेस टेस्ट सारखे पळवले’.

विराट कोहलीच्या या ट्विटमुळे धोनीच्या चाहत्यांना धोनी खरच आज निवृत्तीची घोषणा करणार असे वाटू लागले आहे. कारण विराटने ट्विटमध्ये जो फोटो शेअर केला आहे तो सामना आजच्याच तारखेला खेळवण्यात आला होता. याच सामन्यात धोनीने केलेली खेळी विराट कोहली कधी विसरू शकणार नाही. त्यामुळे विराट कोहलीला धोनीची कमी वाटत आहे.

धोनीचे चाहत्यांना ‘धक्के’ –

एमएस धोनीने अनेक निर्णय अचानक घेऊन आपल्या चाहत्यांना धक्के दिले आहेत. 2014-15 मध्ये धोनीने ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची अचानक घोषणा केली. यानंतर त्याने 2017 मध्ये मर्यादीत षटकांच्या सामन्यातून निवृत्ती घेतली. तर इग्लंड दौऱ्यादरम्यान त्याने आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा देऊन सर्वांनाच धक्का दिला. धोनीच्या राजीनाम्यानंतर विराट कोहलीने संघाची धुरा सांभाळली.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like