ICC World Cup 2019 : अभिमानास्पद ! ‘या’ कारणामुळे धोनी वापरतो तीन कंपन्यांच्या बॅट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही काळापासून भारतीय फलंदाज महेंद्रसिंग धोनी खेळताना तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या बॅट वापरताना दिसत आहे. यामुळे धोनीच्या चाहत्यांना आणि क्रीडा रसिकांना देखील प्रश्न पडला आहे कि, धोनी तीन बॅट घेऊन का खेळत आहे. ज्यावेळी धोनी बॅटिंगसाठी मैदानात उतरतो त्यावेळी त्याच्याकडे वेगळ्या कंपनीची बॅट असते तर मधल्या वेळी दुसऱ्या कंपनीची आणि डावाच्या शेवटी तो वेगळ्या कंपनीची बॅट वापरत असतो. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी केवळ एका चेंडूसाठी बॅट बदलली होती आणि त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार देखील मारला होता.

याविषयी धोनीचे मॅनेजर अरुण पांडे यांनी बोलताना सांगितले कि, तीन कंपन्यांच्या बॅट वापरून धोनी आपल्यावर असलेलं ऋण फेडत आहे. ज्या कंपनीने त्याला त्याच्या वाईट काळात किंवा क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला मदत केली होती त्यांच्यासाठी धोनी हे करत आहे. मात्र यासाठी धोनी कोणत्याही प्रकारचे मानधन घेत नसून तो हे मोफत करत आहे. धोनी खूप मोठ्या मनाचा माणूस असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

कोणताही करार नाही

याविषयी बोलताना BAS या बॅट कंपनीचे मालक पुष्प कोहली यांनी सांगितले कि, या कृतीतून त्याची महानता दिसून येते. धोनीबरोबर आमचे संबंध खूप जुने असून आपण हे फिल्ममध्ये देखील बघितले आहे. मागील वर्षापर्यंत धोनी ऑस्‍ट्रेलियन कंपनी ‘स्‍पार्टनचा’ लोगो असलेली बॅट वापरत होता. मात्र त्याचे पैसे थकवल्याने त्याने या कंपनीवर खटला दाखल केला असून सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान, या वर्ल्डकपमध्ये धोनीला विशेष कामगिरी करण्यात यश ते नसले तरी तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात धोनी कुठेही कमी नाही.

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा