‘हे’ काम पूर्ण केल्यानंतरच महेंद्रसिंह धोनीचा क्रिकेटला ‘अलविदा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याचबरॊबर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा देखील जोर धरत आहेत. मात्र यासंदर्भात बीसीसीआय मोठ्या हालचाली करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

महेंद्रसिंग धोनी हा वर्ल्डकप स्पर्धेनंतर निवृत्त होईल, असे बोलले जात होते, मात्र अजूनपर्यंत धोनीने याविषयी काहीही भाष्य केलेले नाही. त्यामुळे तो इतक्यात निवृत्ती स्वीकारणार नाही अशी माहिती पुन्हा एकदा पुढे येत आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या विंडीज दौऱ्यावर धोनी जाणार नसल्याने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र टाइम्स ऑफ इं‌डियाच्या माहितीनुसार, धोनी इतक्यात निवृत्ती स्वीकारणार नसून तो आपले अपूर्ण काम पूर्ण करणार आहे.

विंडीज दौऱ्यावर जाणार नाही

पुढील महिन्यात भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी -२० सामने खेळणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात धोनी निवृत्ती स्वीकारण्याची शक्यता कमी आहे. धोनी या दौऱ्यात विश्रांती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र त्यानंतर होणाऱ्या भारतीय संघाच्या कार्यक्रमात त्याचा सहभाग असणार आहे.

यापुढे धोनी भारतीय संघात राहून युवा खेळाडू रिषभ पंत याला विकेटकिपिंगचे धडे देणार आहे. धोनी भारतात आणि भारताबाहेर देखील कोणत्याही सामन्यात खेळणार नाही. १५ खेळाडूंमध्ये त्याचा समावेश असणार आहे मात्र अंतिम ११ खेळाडूंमध्ये तो खेळणार नाही. तो रिषभ पंत याला सामन्यांदरम्यान मार्गदर्शन करणार आहे.

दरम्यान, दिनेश कार्तिक देखील भारतीय संघाचा सदस्य असणार आहे. मात्र रिषभ पंत युवा खेळाडू असल्याने त्याला संघात अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे. २३ वर्षीय रिषभ पंत याला या काळात धोनीचे मार्गदर्शन लाभणार असून यामुळे २०२३ मध्ये होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत भारताकडे धोनीसारखाच उच्च प्रतीचा यष्टीरक्षक असणार आहे.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी