खुशखबर ! धोनी T२० वर्ल्डकप पर्यंत निवृत्त होणार नाही, संघ व्यवस्थापनाने घेतला निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप संपल्यानंतर लगेच महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात जोर धरत होत्या. मात्र आता भारतीय संघ व्यवस्थापनानेच धोनीला निवृत्तीपासून रोखल्याची माहिती समोर येत आहे. एका खासगी वृत्त एजन्सीच्या माहितीनुसार महेंद्रसिंग धोनी याला पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप पर्यंत निवृत्त होणार नाही.

भारतीय संघ व्यवस्थापन धोनीला पुढील वर्षीपर्यंत खेळण्याची विनंती करणार आहे. धोनीच्या जागी भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती रिषभ पंतला तयार करत आहेत. त्याचबरोबर तो या स्थानासाठी योग्य आहे कि नाही याची देखील चाचणी करत आहेत. मात्र जर तो जखमी झाला तर त्याच्याजागी धोनीइतका सक्षम खेळाडू सध्या कुणीही नसल्याने धोनीला निवृत्तीचा पुनर्विचार करण्यास संघ व्यवस्थापनाने भाग पाडल्याची माहिती समोर येत आहे. संघ व्यवस्थापन टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने पंतला तयार करत असून धोनीदेखील या संघात त्यांना हवा आहे. त्यामुळे तो पंतला मार्गदर्शनाबरोबरच खेळात मदत देखील करू शकेल.

दरम्यान, भारतीय संघाच्या एका आधिकाऱ्याने या संस्थेशी बोलताना सांगितले कि, जर रिषभ पंत जखमी झाला तर त्याच्या जागी आता आपल्याकडे कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्याचबरोबर धोनीच्या ताकदीचा देखील दुसरा कुणी खेळाडू भारतीय संघात नाही. याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही कि, पंत हाच धोनीचा वारसदार आहे. मात्र धोनीच्या मार्गदर्शनाखाली तो अजून चांगला खेळ करू शकतो.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like