‘पृथ्वी शॉ’चं फक्त 175 बॉलमध्ये व्दिशतक, 19 चौकारांसह 6 सिक्सर ठोकले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या पृथ्वी शॉने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर आता रणजी ट्रॉफीमध्ये देखील शानदार द्विशतक ठोकले आहे. बडोदा आणि मुंबईमध्ये झालेल्या सामन्यात पृथ्वी शॉ ने चमकदार कामगिरी केली आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पृथ्वी शॉने अर्धशतक केले होते. तर दुसऱ्या डावात त्याने जोरदार कामगिरी करत द्विशतक केले.

मुंबईसाठी ओपनिंग करणाऱ्या पृथ्वी शॉने 175 चेंडूत द्विशतक केले आहे. यावेळी खेळताना शॉ ने 19 चौकार आणि 7 षटकारांसह धावांचा पाऊस पाडला. द्विशतक पूर्ण करताच एक जोरदार फटका मारण्याच्या नादात शॉ 202 धावांवर बाद झाला. बडोद्याचा गोलंदाज भार्गव भट्टने शॉ ला बाद केले.

आठ महिन्यांच्या बंदी नंतर पुन्हा पदार्पण
पृथ्वी शॉ या वर्षी झालेल्या डोप टेस्टमध्ये फेल झाला होता. बंदी असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे त्याला दोषी करार करण्यात आले होते. यावेळी शॉ म्हणाला होता, की मी खोकल्यासाठी कप सीरफ घेतले होते. यानंतर शॉ ला आठ महिन्यांसाठी क्रिकेट खेळण्यासाठी निर्बंध घालण्यात आले होते. निर्बंध हटल्यानंतर शाॅ ने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सहभाग घेऊन चांगलं प्रदर्शन केलं होते.

पृथ्वी शॉच्या कामगिरीवर एक नजर
भारतासाठी या युवा ओपनरने दोन कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 1 शतक आणि 1 अर्धशतक यांच्या मदतीने 237 धावा बनवल्या होत्या. वेस्टइंडिजच्या विरोधात खेळताना राजकोट येथील आपल्या पहिल्याच सामन्यात शानदार शतक झळकावले होते. शॉची सर्वोच्च धावसंख्या 134 धावा आहेत. त्याने 17 सामन्यांमध्ये सामन्यांमध्ये 60.93 च्या सरासरीने 1767 धावा केल्या आहेत आणि 26 लिस्ट सामन्यांमध्ये 40.19 च्या सरासरीने 1045 धावा केल्या आहेत. तर 38 टी 20 सामन्यांमध्ये 25.57 च्या सरासरीने 972 धावा केल्या आहेत.

Visit : policenama.com