फक्‍त 52 बॉलमध्ये नाबाद 106 रन, वर्ल्ड रेकॉर्ड करत ‘या’ फलंदाजाने विराट कोहलीला टाकलं मागे

सिंगापूर : वृत्तसंस्था – नेपाळचा कर्णधार पारस खडका याने सिंगापूरविरुद्ध नाबाद शतक ठोकून विश्वविक्रम केला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि भारतीय कर्णधार विराट यांसारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे. तसेच त्याने टी 20 मध्ये नेपाळकडून पहिलं शतक करण्याचा मानही मिळवला.

तिरंगी मालिकेत प्रथम फलंदाजी करत सिंगापूरने नेपाळविरुद्ध 151 धावा केल्या. नेपाळने 152 धावांचा पाठलाग करताना 9 गडी आणि 4 षटके राखून विजय मिळवला. पारसने 106 धावा केल्या. पारसने त्याच्या खेळीत 9 षटकार आणि 4 चौकार मारले. याआधी हे रेकॉर्ड नेदरलँडचा कर्णधार पीटर सीलरच्या नावावर होते. पीटर सीलरने स्कॉटलंडविरुद्ध नाबाद 96 धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने इंग्लंडविरुद्ध 90 धावांची खेळी केली होती.

वेगवान शतक ठोकणारा पारस तिसरा कर्णधार ठरला
पारसने केवळ एक विक्रम नोंदविला नाही, तर टी -२० मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा तो तिसरा कर्णधारही ठरला आहे. पारसने 49 चेंडूत शतक ठोकले. सर्वात वेगवान शतक झळकावणा कर्णधारांच्या यादीमध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 बॉलमध्ये शतक झळकावणाऱ्या रोहित शर्माचा पहिला क्रमांक आला त्यांच्यानंतर फाफ डू प्लेसीने 46 बॉलमध्ये शतक झळकावले.