केन विलियमसन आणि अकिला धनंजय यांची गोलंदाजी संदिग्ध आढळल्याने क्रीडा विश्वात ‘खळबळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघांसाठी वाईट बातमी असून न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन आणि श्रीलंकेचा फिरकीपटू अकिला धनंजय यांच्या गोलंदाजीत दोष आढळला असून आयसीसीने  याची माहिती दिली आहे. आयसीसीने  याचा अहवाल दोन्ही संघांच्या व्यवस्थापकांना दिला असून यावर लवकरच निर्णय होणार आहे.

आयसीसीच्या या निर्णयामुळे आता दोघानांही 14 दिवसांच्या आत गोलंदाजी चाचणी द्यावी लागणार आहे. हि चाचणी 18 ऑगस्टपासून पुढील 14 दिवसांच्या आत करण्यात येणार आहे. तोपर्यंत हे दोघे गोलंदाजी करू शकतात. न्यूझीलंडचा कर्णधार  विलियमसन याने पहिल्या कसोटी सामन्यांत 3 षटके गोलंदाजी केली होती.  त्याने आतापर्यंत 73 कसोटी सामने खेळले असून त्याच्या नावावर 29 विकेट देखील आहेत. त्याचबरोबर श्रीलंकेचा मुख्य फिरकी गोलंदाज अकिला धनंजय याची देखील शैली संदिग्ध आढळली असून त्याने श्रीलंकेसाठी आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले असून यामध्ये 33 विकेट घेतल्या आहेत.

पहिल्या सामन्यांत श्रीलंकेचा विजय

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यांत यजमान श्रीलंकेने न्यूझीलंडचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवत शानदार विजय मिळवला होता. या सामन्यांत अकिला धनंजय याने शानदार कामगिरी करत 6 बळी मिळवले होते. त्यामुळे आता त्याच्यावरील या बंदीमुळे श्रीलंकन संघापुढील आव्हान वाढले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like