ICC कडे भारतीय खेळाडूंची तक्रार करणारा पाकिस्तान तोंडावर आपटला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या वन-डे सामन्यात टीम इंडियाने आयसीसीकडून परवानगी घेत लष्करांच्या जवानांसारखी टोपी घातली. लष्करांच्या जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टीम इंडियाने ही टोपी परिधान करण्याचे ठरवले होते. परंतु पाकिस्तानने मात्र याबद्दल आयसीसीकडे तक्रार करत आक्षेप नोंदवला होता. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे(ICC) खेळाडूंची तक्रार करणारा पाकिस्तान चांगलाच तोंडावर आपटल्याचे दिसून आले.

ऑस्ट्रेलियाविरोधातील पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेतील तिसरा सामना रांचीमध्ये ८ मार्चला झाला. या सामन्यात टीम इंडियाने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना आदरांजली वाहत त्यांच्यासारखी टोपी घातली. तसंच सामन्याचा निधी राष्ट्रीय सुरक्षा मंडळाला मदत म्हणून दिला.

दरम्यान, याबाबत बोलताना आयसीसीचे व्यवस्थापक क्लेरी फुर्लोग म्हणाले की, “शहीद जवानांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्यासारखीच टोपी घालण्याची परवानगी बीसीसीआयने आयसीसीकडे मागितली होती. त्यांना आम्ही परवानगी दिली आहे.” असे म्हणत स्पष्टीकरण दिले.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने या प्रकरणी बीसीसीआयविरोधात आयसीसीला कडक शब्दात पत्र लिहिलं होतं. इतकेच नाही तर, भारताने लष्कराची टोपी घातली आहे त्यामुळे भारताविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. इतकेच नाही तर, बीसीसीआयने आयसीसीकडे मागितलेल्या परवानगीचा दुरुपयोग केला असा आरोपही पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख एहसान मनी यांनी रविवारी कराचीत केला होता.

परंतु आयसीसीचे व्यवस्थापक क्लेरी फुर्लोग यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर मात्र पाकिस्तान चांगलेच तोंडावर आपटले आहे.

ह्याहि बातम्या वाचा-

?शरद पवारांच्या माघारीनंतर माढ्यात मोहिते पाटील की प्रभाकर देशमुख

?युतीने आठवड्याभरात जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा,अन्यथा… : घटक पक्षांचा इशारा

?देशात मोदींचीच हवा, शरद पवारांना बदललेल्या ‘हवे’चा अंदाज येतो : मुख्यमंत्री

?नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊच शकत नाही ‘या’ नेत्याचे वक्तव्य