षटकार मारूनच जिंकतोय भारत ! संघाला MS धोनीची गरज नाही ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीम इंडियांन न्युझिलंडविरुद्धच्या टी 20 सामन्यांच्या मालिकेत 4 – 0 आघाडी घेतली आहे. पहिल्या तीनही सामन्यांमध्ये षटकार मारून सामने जिंकले आहेत. षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून देणारा फलंदाज कोण अशा प्रश्न जर कोणी विचारला तर सर्वजण एकच उत्तर देतात ते म्हणजे महेंद्रसिंह धोनी. परंतु गेल्या तीन सामन्यांमध्येही टीम इंडियानं षटकार मारंत विजय कायम केला आहे. पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यर, दुसऱ्या सामन्यात शिवम दुबे आणि तर तिसऱ्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्मानं षटकार मारला. त्यामुळे आता असा प्रश्न समोर येतो की, टीम इंडियाला आता खरंच धोनीची गरज नाही का ?

10 जुलै 2019 रोजी धोनीनं आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारताकडून अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर धोनी मैदानावर दिसला नाही. षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून देणारा सर्वोत्तम फिनिशर अशी धोनीची ओळख आहे. सध्या भारत कसोटी, वन डे आणि टी 20 सामने खेळताना दिसत आहे. धोनीशिवाय टीम इंडिया विजय मिळवताना दिसत आहे. गेल्या अनेक सामन्यांमध्ये वेगवेगळे फलंदाज षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून देताना दिसत आहेत. अशा भारतीय संघाला धोनीची कमतरता जाणवत नाही अशी चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे.

भरातीय संघानं नाही स्विकारला पराभव
संघात कोण आहे कोण नाही यामुळे फारसा फरक पडत नाही असंच काहीसं टीम इंडियानं विराटच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यात सिद्ध केलं आहे. वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर संघ अजय राहिला आहे. वर्ल्डकप 2019 मधील सेमी फायनलनंतर टीम इंडियानं एकाही द्विपक्षीय मालिकेत पराभव स्विकारलेला नाही. एक द्विपक्षीय मालिका बरोबरीत राहिली.