Cricket News | वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या ‘या’ कॅप्टनला झाली मोठी दुखापत

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Cricket News | क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये भारताला 2012 साली अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup) जिंकून देणाऱ्या कॅप्टनच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. उन्मुक्त चंद (Unmukt Chand) असे या कॅप्टनचे नाव आहे. उन्मुक्त चंदने आयपीएल (IPL) आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आपली क्षमता दाखवून दिली आहे. मात्र दिल्ली क्रिकेट असोसिएशनशी (Delhi Cricket Association) झालेला वाद, दुसऱ्या स्टेटकडून खेळण्याचा निर्णय, ढासळलेली कामगिरी अशा अनेक कारणांमुळे उन्मुक्त चंदला भारत सोडावा लागला.आता तो अमेरिकेत स्थायिक झाला असून अमेरिकेकडून क्रिकेट खेळत आहे. याच उन्मुक्त चंदला एक मोठी दुखापत झाल्याचे समोर आले आहे. उन्मुक्त चंदने सोशल मीडियावर पोस्ट करून या दुखापतीची माहिती दिली आहे. (Cricket News)

उन्मुक्त चंदला मोठी दुखापत
उन्मुक्त चंदने सोशल मीडियावर आपल्याला झालेल्या दुखापतीची माहिती दिली आहे. ‘खेळाडूसाठी प्रत्येक दिवस सोपा नसतो… कधी तुम्ही जिंकून घरी येता तर कधी निराश होऊन. कधी तरी तुम्हाला दुखापतही होते. मी देवाचे आभार मानतो की त्यानं मला मोठ्या संकटातून वाचवलं. व्यवस्थित खेळा, सुरक्षित राहा.’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. (Cricket News)

उन्मुक्त चंदची कारकीर्द
उन्मुक्त चंदनं आतापर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 67 मॅचमध्ये 32 च्या सरासरीनं 3379 रन्स केले आहेत. त्यात 8 शतक आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 120 मॅचमध्ये 4505 धावा त्याच्या खात्यात जमा आहेत. तर टी20 क्रिकेटमध्ये त्यानं 79 मॅचमध्ये 1600 रन्स केले असून त्यात 3 शतकांचा समावेश आहे. सध्या उन्मुक्त चंद अमेरिकेत स्थायिक झाला असून तिथल्या मेजर क्रिकेटमध्ये खेळत आहे.

 

Web Title :- Cricket News | under 19 world cup winning captain unmukt chand get injured sport news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shahajibapu Patil | सगळेच आनंद दिघे नसतात, पण त्यांचे कार्य पुढे नेणारा एखादाच…, शहाजी पाटलांचे शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर

‘KRK नं केला धक्कादायक दावा; म्हणाला – ‘जे सुशांत सिंग राजपूतसोबत घडलं, तेच आता माझ्यासोबत….’

Maharashtra CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, यंत्रणा सतर्क