भारताकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानने कॅप्टन सरफराज बद्दल ‘हा’ मोठा निर्णय घेतला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे.

या सामन्यात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर संघावर टीका केली होती. १९९२ पासून सलग सात वेळा भारतीय संघाने वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केले आहे. त्यानंतर आता पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याच्यावर माजी क्रिकेटपटूंनी मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे.

मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर आता सरफराज अहमद याच्यावर मोठे संकट येण्याची शक्यता आहे. भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची काल एक बैठक पार पडली. या बैठकीत पीसीबीचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वर्ल्डकप स्पर्धा पार पडल्यानंतर सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार असून यानंतर काही धक्कदायक निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

त्याचबरोबर वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ पुढील फेरीत गेला नाही तर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याची कर्णधार पदावरून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर संघातील अनेक खेळाडूंना देखील बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

दरम्यान, कर्णधारपदाबरोबरच पीसीबी सपोर्ट स्टाफमध्ये देखील मोठे बदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशिक्षक मिकी आर्थर, मॅनेजर तलत अली, त्याचप्रमाणे बॉलिंग प्रशिक्षक अजहर महमूद यांना देखील पदावरून हटवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता उर्वरित सामन्यात पाकिस्तान कसा खेळ करतो हे पाहणे महत्वाचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स