Video : पाकिस्तानचा कॅप्टन सरफराजला फॅनने ‘शिव्या’ हासडल्या !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. वर्ल्ड कप २०१९ मधील गुणतालिकेत १० पॉईंट्ससहऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नऊ – आठ पॉईंट्स मिळवत न्यूझीलंड आणि इंग्लंड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे. मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर आता सरफराज अहमद याच्यावर मोठे संकट येण्याची शक्यता आहे.

भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीत पीसीबीचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वर्ल्डकप स्पर्धा पार पडल्यानंतर सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार असून काही खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावर देखील खेळाडूंना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.त्यानंतर आता पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याला सार्वजनिक ठिकाणी ट्रोल करण्यात आले. शुक्रवारी एका चाहत्याने पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदचा अपमान केला आणि तो व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्या चाहत्याने सरफराज अहमद याला ट्रोल करत त्याच्यावर अत्यंत जहरी टीका केली. या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसचा मुद्दा देखील फार गाजला. त्यामुळे देखील संघातील अनेक खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

लंडनला रवाना होण्यापूर्वीच पाकच्या माजी खेळाडूंनी डाएट प्लानवर नाराजी प्रकट केली होती. माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही सर्फराजला ढेरपोट्या व बिनडोक असे म्हटले होते. चुकीचे निर्णय, क्षेत्ररक्षणात ढिसाळपणा यामुळे पाक खेळाडूंवर टीका सुरुच आहे. त्यानंतर शुक्रवारी अशाच प्रसंगाला सरफराजला सामोरे जावं लागलं.या व्हिडिओत दिसणारा व्यक्ती सुरुवातीला सरफराजला एक फोटो घेण्याची विनंती करतो, मात्र त्यानंतर तो व्हिडीओ शूट करत राष्ट्रीय कर्णधारा बरोबर असभ्य वर्तन करतो. या व्हिडिओत तो व्यक्ती सरफराजला म्हणाला कि, तू इतका जाड कसा झाला आहेस? तु डुक्कराप्रमाणे जाड दिसत आहेस.पाकिस्तानचा नाव तू खूप मोठं केले आहेस. त्यावर सरफराज त्याला काहीही न बोलता पुढे निघून जातो.दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आत त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. कर्णधाराबरोबर असे वर्तन करायला नको असेदेखील काही नेटिझन्सची म्हटले आहे तर काही जणांनी या तरुणालाच ट्रोल केले आहे.

https://twitter.com/SyedRezaMehdi/status/1142062652321075205

 

आरोग्यविषयक वृत्त

हॉटेलमधील “फिंगर बाऊलमध्ये” हात धुणे चुकीचे हे आहेत त्याचे दुष्परिणाम

वेळ नसेल तर … फिटनेससाठी सूर्यनमस्कारही पुरेसे

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा “पायलेट्स एक्सरसाइज”

जाणून घ्या “योगा” कधी करावा

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ

सिने जगत

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

मोगॅम्बो खुश हुवा ! गुगलचे ‘डुडल’ द्वारे खल’नायक’ अमरीश पुरी यांना अभिवादन