बकरी ईदला ‘हा’ क्रिकेटर देणार बैलाची ‘कुर्बानी’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुस्लिम  बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणजे बकरी ईद. या दिवशी मोठ्या प्रमाणावर सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरी करत असतात. रमजान ईदच्या ७० दिवसांनंतर येणाऱ्या या सणाला मुस्लिम धर्मात फार मोठे महत्व आहे. या दिवसासाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम नागरिक कुर्बानी देण्यासाठी प्राणी खरेदी करत असतात.

याच संदर्भात पाकिस्तानचा कर्णधार  सरफराज अहमद याचा सध्या एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून यामध्ये तो बैलबाजारात आपल्या मुलाबरोबर आल्याचे दिसून येत आहे. १२ ऑगस्ट रोजी बकरी ईद साजरी होणार असून यासाठी मुस्लिम बांधव मोठी खरेदी करताना दिसून येत आहेत.  या व्हिडिओमध्ये तो आपल्या जवळच्या मित्रांसह या बैल बाजारात बैल खरेदी करण्यासाठी आलेला दिसून येत आहे.

त्यामुळे तो या बकरी ईदला तो बैलाची कुर्बानी देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पाकिस्तानमध्ये बैलाची देखील कुर्बानी दिली जाते. बकरीऐवजी काही ठिकाणी बैलांची देखील कुर्बानी देण्यात येते.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला अतिशय खराब कामगिरी केली होती. त्यामुळे सरफराज अहमद याला कर्णधारपदावरून हटवण्याच्या देखील चर्चा सुरु आहेत. त्यामुळे कसोटी संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेतले जाण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like