’पाकिस्तानी क्रिकेटर’ने लावला वर्णभेदाचा आरोप, काऊंटी क्रिकेटमध्ये हत्ती धुणारा म्हटले जात होते

लंडन : वृत्तसंस्था –  माजी ऑफ स्पिनर अजीम रफीकने काऊंटी क्रिकेट खेळताना वर्णभेदाचे टोमणे मारण्यात आल्याचा आरोप केला असून, चौकशी दरम्यानसुद्धा याचा पुनरुच्चार केला. कायदा फर्म स्क्वॉयर पेटन बॉग्स रफीकच्या आरोपांची चौकशी करत आहे. 27 फेब्रुवारी 1991 ला पाकिस्तानच्या कराचीमध्ये जन्मलेल्या रफीकने क्रिकइन्फोला सांगितले की, आशियाई असल्याने त्याला कशाप्रकारे टोमणे ऐकावे लागले होते. त्याने सांगितले की, त्यांना पाकी किंवा हत्ती धुणारा म्हटले जात होते आणि त्याला हेदेखील ऐकावे लागत होते की जेथून आला आहेस तेथे परत जा.

यॉर्कशायर काऊंटीने शुक्रवारी जारी वक्तव्यात म्हटले की, आम्ही अजीम रफीकच्या आरोपांना गांभीर्याने घेतले आहे आणि या प्रकरणाचा तपास सप्टेंबरमध्ये स्वतंत्र कायदा फर्मने सुरू केला होता. रफीकने जून 2009 मध्ये यॉर्कशायरकडून ससेक्सच्या विरुद्ध फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता, तर त्याने ऑगस्ट 2009 मध्ये ससेक्सच्या विरोधात लिस्ट ए क्रिकेटमध्ये डेब्यू केला. तो इंग्लंडच्या अंडर 15 आणि अंडर 19 टीमचे नेतृत्वसुद्धा केले आहे, तर सर्व स्तरावर इंग्लंड टीमचे नेतृत्व करणारा तो आशियाई वंशाचा पहिला यॉर्कशायर खेळाडू होता.

एकदा त्याने इंग्लंडच्या गोलंदाजी कोचच्या समोर मायकल वॉनच्या विरोधात नेट सेशनच्या दरम्यान यशस्वीपणे कामगिरी केली होती. ज्यानंतर त्यास इंग्लंडचा भविष्यातील गोलंदाज समजले जाऊ लागले. याच वर्षी सप्टेंबरमध्ये त्याने वर्णभेदाचा आरोप केला होता.

असीमच्या करिअरबाबत बोलायचे तर त्याने 39 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 873 धावा बनवण्यासह 72 विकेट घेतल्या आहेत. फर्स्ट क्लासमध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि 4 अर्धशतकंसुद्धा आहेत, तर 35 लिस्ट ए मॅचमध्ये त्याने 252 धावा बनवण्यासह 43 विकेट घेतल्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने एक अर्धशतकसुद्धा केले आहे.