टीम इंडियाचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह विवाहबंधनात अडकणार; अभिनेत्री की कॉमेंटेटर, 2 नावं चर्चेत

पोलिसनामा ऑनलाईन : बुमराहने काही दिवसांपूर्वी इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून माघार घेतली. मात्र सु्ट्टी घेण्यामागचे खरे कारण आता समोर आले आहे. बुमराह लवकरच लग्नबेडित अडकणार आहे. टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (jasprit bumrah marriage) लवकरच बोहल्यावर चढणार आहे. पण त्याची होणारी भावी (jasprit bumrah Wife) बायको कोण आहे, याबाबतची माहिती कोणालाच माहिती नाही. पण २ नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

एक म्हणजे प्रसिद्ध क्रिकेट प्रेझेंटेटर सजंना गणेशन (sanjana ganesan) संजना प्रसिद्ध क्रिकेट प्रेंझेंटेटर आहे. संजनाने आतापर्यंत क्रिकेट अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहेत. तसेच आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्ससाठी फॅन शो होस्ट केला आहे. संजना आणि बुमराहाच क्रिकेटशी संबंध असल्याने हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटंलं जात आहे. आणि दुसरं नाव म्हणजे (Anupama Parameswaran) दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन  अनुपमा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेस आहे. विशेष म्हणजे अनुपमाने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर गालावर रंग लावलेला स्वत:चा फोटो शेअर केला होता. “हॅपी हॉलिडे” असं या फोटोला कॅप्शन दिलं होतं. अनुपमानेही काही दिवसांची सुट्टी घेतली आगे. यामुळे बुमराह आणि अनुपमाचं नावही चर्चेत आहे.

सूत्रांनुसार, कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. कोरोना नियमांमुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना बुमराहच्या लग्नाला उपस्थित राहता येणार नाही. बुमराहने लग्नासाठी सुट्टी घेतल्याचं स्पष्ट झाले आहे. पण बुमराहने लग्नासंबंधीतील कोणतीही माहिती दिलेली नाही. पण बुमराहचं लग्न टूरिस्ट पॉईंट असलेल्या गोव्यात पार पडणार असल्याचं म्हटंल जात आहे. बुमराह याआधी आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईत येणार आहे.