द्विशतक करुन कोहलीनं केला ‘विराट’ विक्रम, तोडला ब्रॅडमनचा 71 वर्षांपुर्वीचा रेकाॅर्ड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यात सुरु असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने शानदार द्विशतक साजरे केले आहे. त्याने 295 चेंडूंमध्ये 28 चौकारांच्या साहाय्याने 200 धावा केल्या. कारकिर्दीतील सातवे द्विशतक त्याने साजरे केले. त्यामुळे आता त्याने सर्वाधिक द्विशतक साजऱ्या करण्याबाबत महेला जयवर्धने आणि वॉली हेमंड यांची बरोबरी केली. त्याचबरोबर त्याने कसोटी कारकिर्दीत 7 हजार धावा देखील पूर्ण केल्या. तसेच त्याने 71 वर्षांपुर्वीचा ब्रॅडमनचा विक्रम देखील मोडला आहे.

सचिन सेहवागला सोडले मागे –
कोहलीने या शतकाबरोबरच सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा 6 द्विशतकांचा रेकॉर्ड देखील मोडला. त्याचबरोबर रिकी पॉंटिंग, युनूस खान, मरण अटापट्टू, यांनी देखील 6 द्विशतक केले आहेत.

मागील 3 वर्षात केले सर्व द्विशतक –
विराट कोहलीने कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजी करताना पहिल्या डावात 21 शतके झळकावली आहेत. पहिल्या 9 शतकांमध्ये एकही द्विशतक नव्हते. मात्र पुढील 7 शतकांमध्ये त्याने 6 द्विशतके झळकावली.

150 किंवा अधिक धावा करण्याचा रेकॉर्ड
कर्णधार विराट कोहली याने कर्णधार म्हणून आतापर्यंत सर्वात जास्त दीडशतके झळकावली असून त्याने याबाबतीत दिग्गज फलंदाजांना मागे सोडले आहे. त्याने 8 वेळा हा रेकॉर्ड केला असून महेला जयवर्धने, मायकल क्‍लार्क, ब्रायन लारा आणि ग्रॅमी स्मिथ यांनी सात वेळा दीडशेपेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

Visit : Policenama.com