‘टीम इंडिया’चे प्रशिक्षक रवी शास्त्रींचे पद धोक्यात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवडीसाठी भारतीय माजी क्रिकेटर कपिल देव यांच्या अध्यक्षतेसाठी सल्लागार समितीवर हितसंबंध जपल्याचा आरोप आहे. यात अंशुमन गायकवाड आणि रंगास्वामी यांंचा देखील समावेश आहे. हा आरोप मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी केला आहे. या तिघांना ही आता नोटीस पाठवण्यात आली आहे.

यामुळे हे आरोप खरे ठरले तर रवि शास्त्रींच्या अडचणी वाढू शकतात. एका रिपोर्टनुसार सीएसीच्या सदस्यावर आरोप खरे ठरेल तर शास्त्रींना पद सोडावे लागेल. त्यानंतर पुन्हा एकदा प्रशिक्षक निवड होऊ शकते. परंतू सीओए अध्यक्ष विनोद राय यांनी स्पष्टीकरण दिले की सीएसीचे सदस्यावर लावले आरोपांचा रवि शास्त्रीच्या निवडीशी कोणताही संबंध नाही आणि त्यांच्या पदाला कोणताही धोका नाही.

विनोद राय यांनी सांगितले की रवि शास्त्रींच्या निवडीसंबंधित हे प्रकरण नाही, सीओएचे दुसरे सदस्य रविंद्र थोडगे यांना सांगितले की, सीएसी च्या निवडीवेळी सर्व सदस्यांनी बीसीसीआयचे ‘नो कॉनफल्किट ऑफ इंटरेस्ट सर्टिफिकेट’ दिले होते ज्यावर बीसीसीआयचे काहीही म्हणणे नाही.

रवि शास्त्रींच्या मुद्दावर थोडगे यांनी बोलताना सांगितले की सीएसीची निर्मिती फक्त प्रशिक्षक निवडण्यासाठी झाली, रवि शास्त्रींची निवड आता झाली आहे, त्यांच्याशी करार देखील झाला आहे. त्यामुळे आता कोणताही बदल होणार नाही.

शांता रंगास्वामी यांनी दिला राजीनामा
भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली. ज्या कपिल देव, शांता रंगास्वामी आणि अंशुमन गायकवाड यांचा समावेश आहे, या समितीने ऑगस्ट महिन्यात रवी शास्त्रींना प्रशिक्षक म्हणून निवडले. कपिल देव यांच्या अध्यक्षतेसाठी सल्लागार समितीवर हितसंबंध जपल्याचा आरोप आहे. हा आरोप करत मध्यप्रदेशचे क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी तक्रार दाखल केली आहे.

यानंतर रंगास्वामी यांनी सीएसी पदाचा राजीनामा दिला. ते म्हणाले की रविवारी प्रशासकांची समिती आणि बीसीसीआय सीईओ राहुल जौहरी यांना संबंधित मेल पाठला आहे. या तिघांना ही 10 ऑक्टोबरपर्यंत तक्रारीवर उत्तर द्याचे आहे.

Visit : policenama.com