‘हिटमॅन’ रोहितची 1 दिवसाची कमाई ‘एवढी’, जाणून घेतल्यानंतर तुम्हाला देखील ‘धक्का’ बसेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक खेळाडूंना एखाद्या प्रोडक्ट्सचे ब्रँडिंग करण्याची संधी मिळते. ते त्या ब्रँडचे ब्रँड अ‍ॅम्बेसिटर देखील बनतात. त्यातील भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आहेत सचिन तेंडूलकर, एम एस धोनी, विराट कोहली. त्यांचं नावच एक ब्रँड आहे.

पण आणखी एक खेळाडू आहे जो ब्रँड म्हणून ओळखला जातो. त्यांची क्रिकेटमधील कामगिरी त्याला उंच शिखरावर नेणारी आहे. तो आहे रोहित शर्मा. भारतीय संघातील ओपनर म्हणून त्याची ओळख आहे. वन डे असो वा टी – 20 किंवा कसोटी रोहित शर्माने मैदानात धावांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे रोहित कॉर्पोरेट क्षेत्रात मोठा ब्रँड तयार झाला.

2019 च्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये मोठी कामगिरी केली. भारतीय संघाला विजय तर मिळाला नाही. परंतू सामन्यानंतर रोहितची चर्चा झाली नसती तर विशेष. भारतीय संघाचे उपकर्णधारपद त्यानंतर कसोटीमध्ये सामनावीर म्हणऊन रोहितने केलेल्या कामगिरीमुळे तो ब्रँड झाला. रोहितमध्ये अनेक कंपन्या गुंतवणूक करण्याचा विचार करतात. स्वताच एक ब्रँड असलेल्या रोहितकडे 20 पेक्षा जास्त ब्रॅंड असल्याचे बोलले जाते. रोहित जाहिरात करत असलेल्या ब्रँडमध्ये सीएट टायर्स, रेलिस्प्रे, शार्प इलेट्रॉनिक्स, ड्रीम 11, आदिदास, हब्लोट वॉचेस असे आणि यासारखे 11 विविध ब्रँड आहेत.

रोहितच्या ब्रॅंड व्हॅल्यूची माहिती कोणालाही नसली तरी, त्याच्या कमाईत या वर्षाला 75 कोटींची वाढ झाली आहे. असे ही सांगितले जाते की रोहित सध्या प्रत्येक ब्रँडसाठी एका दिवसाला 1 कोटी रुपये घेतो. यात वृत्तपत्र, डिजिटल, टीव्ही, इव्हेंट्स यांचा समावेश आहे.

आयसीसी वर्ल्डकपमध्ये रोहितने 5 शतक केली आहेत. अशी कामगिरी करणारा हा पहिलाच फलंदाज असेल. याच कारणाने त्यांची ब्रँड वॅल्यू वाढली आहे. आता त्यांना कसोटीमधील सलामवीर म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. केवळ क्रिकेटमध्येच नाही तर तरुण, कुटूंब या सर्वांवर रोहितचा प्रभाव असल्याचे त्यांच्यासह काम करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले.

Visit : Policenama.com