‘हिटमॅन’ रोहितच्या सन्मानार्थ कॅप्टन कोहली बनवला विराट ‘व्दारपाल’, स्वतः केला दरवाजा बंद (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जोरात सुरुवात केली असून दोन्ही सलामीवीरांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने जवळपास ५०० धावांचा डोंगर उभा केला आहे. रोहित शर्मा याने 176 धावांची शानदार खेळी केली असून मयांक अग्रवाल याने शानदार 215 धावांची खेळी केली आहे. या दोघांनी 317 धावांची सलामी खेळी करत पहिल्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली.

ज्यावेळी रोहित शर्मा बॅड झाला त्यावेळी कर्णधार विराट कोहली त्याच्या स्वागतासाठी खास पॅव्हेलियनच्या दरवाजावर येऊन थांबला होता. तसेच खूप वेळ त्याने टाळ्यादेखील वाजवल्या. त्यानंतर रोहित शर्मा जवळ आल्यानंतर त्याची पाठ थोपटून त्याचे अभिंनदन देखील केले. तसेच कोहलीने स्वतः गेट बंद केले. त्यामुळे साध्य त्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

रोहितच्या नावावर चार शतके
भारतीय संघाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर यासंबंधी एक व्हिडीओ टाकण्यात आला आहे. यामध्ये रोहित शर्मा याच्या शतकी खेळीचा व्हिडीओ टाकण्यात आला आहे. याआधी रोहित शर्मा याने खेळलेल्या 27 कसोटी सामन्यांमध्ये 40 च्या सरासरीने 1585 धावा काढल्या आहेत. तसेच त्याने या कालावधीत तीन शतके देखील झळकावली होती. त्यानंतर आता कालच्या शतकाने त्याची कसोटीमध्ये चार शतके झाली असून त्याने पहिल्यांदा कसोटीमध्ये सलामीला उतरला होता. तसेच पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावणाऱ्या रोहित शर्मा याची भारतीय मैदानावर कसोटी सरासरी आता 98.22 झाली असून संपूर्ण कारकिर्दीत आपली कसोटी सरासरी 99.9 असणाऱ्या डॉन ब्रॅडमन यांची देखील घरच्या मैदानावर सरासरी इतकीच होती.

isit : Policenama.com