ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरण्यापुर्वीच भारताला मोठा ‘धक्का’ ! ‘हा’ स्टार खेळाडू जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीलंकेविरुद्ध टी -२० मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडियासमोर सर्वात मोठे आव्हान ऑस्ट्रेलिया आहे. त्याविरुद्ध विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया 14 जानेवारी रोजी मुंबईत पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. पण त्याआधी संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. या महत्त्वपूर्ण सामन्याआधी भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. सराव सत्रात तो जखमी झाला असल्याचे समजते.

नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू रोहितच्या अंगठ्यावर आदळला, त्यानंतर त्याच्या दुखापतीबद्दल संघ चिंतेत आहे. दरम्यान, महत्त्वपूर्ण मालिकांपूर्वी रोहितला दुखापत होते हि पहिली वेळ नाही. कसोटी सामन्यात सुरू होण्यापूर्वीच त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती आणि नोव्हेंबरमध्ये सराव दरम्यान तो जखमी झाला होता.

उजव्या अंगठ्याला दुखापत :
सलामीवीर रोहित शर्मा जेव्हा मुंबईत सराव करत होता, तेव्हा चेंडूने त्याच्या उजव्या अंगठ्याला धडक दिली. फिजिओ नितीन पटेल यांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली, परंतु त्यांच्या पुढील उपचाराची अधिकृत माहिती मिळालेली नाही. या दुखापतीमुळे त्याला पेन पकड्ण्यासदेखील अडचण येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका चित्रात जेव्हा रोहित शर्माचा एक चाहता मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर ऑटोग्राफ घेण्यासाठी गेला असता, रोहितला पेनसुद्धा पकडता आला नाही. याआधी रोहित शर्मा श्रीलंकेविरूद्ध टी -२० मालिकेत संघाबाहेर होता आणि अशा परिस्थितीत त्याची फलंदाजी मुंबईत पाहायला मिळेल अशी चाहत्यांना आशा आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/