Teacher’s Day ! आचरेकर सरांनी नेहमी ‘सरळ’ खेळायला शिकवलं, सचिन तेंडूलकर झाला ‘भावुक’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – शिक्षक आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका पार पडत असतात. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्याने कोणत्याही क्षेत्रात यश मिळवल्यास तो त्या शिक्षकांसाठी सर्वात आनंदाचा क्षण असतो. आपल्या समाजात गुरूला देवाचे स्थान दिले आहे. आजही विविध स्तरातील व्यक्तींनी आपल्या गुरूला श्रद्धांजली वाहत आजचा हा शिक्षक दिन साजरा केला.

यामध्ये भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याचा देखील समावेश आहे. 46 वर्षीय सचिन तेंडुलकर याने देखील ट्विटरवर आपले प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याबरोबरचा फोटो ट्विट करत म्हटले कि, त्यांनी मला आयुष्यात आणि क्रिकेटच्या मैदानात सरळ खेळायला शिकवले. त्यावेळी त्याने आपला फलंदाजी शिकत असतानाच एक फोटो ट्विट केला आहे. यामध्ये त्याने लिहिले कि, शिक्षक केवळ शिक्षा देत नाही तर आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असणारी मूल्ये देखील देतो.

आचरेकर सरांनी देखील मला हीच शिकवण दिली.  त्यांच्या या मूल्यांवर आजदेखील मी माझे जीवन जगत आहे. रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकरच्या बरोबरच विनोद कांबळी, अजित आगरकर, रमेश पोवार यांसारखे खेळाडू देखील घडवले. त्यांना 1990 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार आणि 2010 मध्ये पदमश्री देऊन गौरवण्यात आले होते.दरम्यान, रमाकांत आचरेकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 87 व्या वर्षी  2 जानेवारी 2019 मध्ये त्यांचे निधन झाले.